सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत कल्याण कर्जत लोकल सेवा विस्कळित झाली आहे. कर्जतकडून कल्याणच्या दिशेने जाणारी आणि कल्याणकडून कर्जतकडे जाणारी लोकल सेवा विस्कळित झाली आहे. सकाळी ७ वाजल्यापासुन ही लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.
ठाणे; प्रतिनिधी कर्जतवरून सीएसटीकडे निघालेल्या लोकल भिवपुरी स्टेशनवर आल्यानंतर चालकाच्या लक्षात आले की, रेल्वे ट्रॅकवरील खडी बाजुला झाली होती, आणि त्याठिकाणी मोठा खड्डा पडला होता. याची सुचना कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर या मार्गावरील अप आणि डाउन या दोन्ही मार्गावर वाहतुक बंद आहे.ट्रॅकवर पडलेला खड्डा बुजवण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मात्र ऐन कामाला जाण्याच्या वेळी रेल्वे वाहतुक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
जाहिरात