पाटगांव येथील श्री स्वयंभू सांब मंदिराचा दि. ९ ते ११ रोजी कलशारोहण सोहळा.

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | फेब्रुवारी ०६, २०२३.

सुरेश सप्रे | देवरूख

देवरूख व पाटगांव येथून जाणाऱ्या सप्तलिंगी नदीच्या काठावर वसलेल्या स्वयंभू सांब मंदिराचा तसेच श्री गणेश, श्री पार्वती, श्री महालक्ष्मी, श्री निनावीदेवी, श्री विठ्ठलाई देवी यांच्या पाषाण मूर्तींचा जिर्णोद्धार व कलशारोहण सोहळा ९ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणार आहे.

श्री. ष.ब्र.प्र. १०८ श्री गुरु महादय्या रविशंकर शिवाचार्य महाराज, (रायपाटण) यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. मंदिराचा जिर्णोद्धार ज्यांच्या संकल्पनेतून होत आहे ते उद्योजक तुषार खेतल यांचेसह पाटगांवचे रहीवासी माजी मंत्री रवींद्र माने, विद्यमान आमदार शेखर निकम, मा. आमदार रमेश कदम, मा. आमदार सुभाष बने, मा. आमदार सदानंद चव्हाण, श्री. चंद्रकांत भोजने, श्री. शंकर माटे, मा. जि.प. अध्यक्ष रोहन बने, मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सौ. नेहा माने, पाटगांव सरपंच सौ. ज्योती गोपाळ, देवरूखचे नगरसेवक संतोष केदारी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यामध्ये नियोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे:

दि. गुरुवार, ०९ फेब्रुवारी २०२३.

देवतांच्या मूर्तींचे स्वागत व सहाही देवतांच्या मूर्तींचे औक्षण व मंदिराभोवती प्रदक्षिणा, श्री. ष.ब्र.प्र. १०८ श्री गुरु महादय्या रविशंकर शिवाचार्य महाराज यांचे प्रवचन व महाप्रसाद.

देवतांना धान्याधिवास, जलाधिवास व शय्याधिवास.

शुक्रवार, दि. १० फेब्रुवारी २०२३.

ध्वजारोहण व विधीविधान पुजन, होमहवन

देवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना व महाआरती, महाप्रसाद, प्रवचन (रायपाटण)

हरिपाठ व रात्रौ १० वा. ह.भ.प. श्री. ब्रम्हचारी गुरुवर्य भागवत, देवाची आळंदी यांचे सुश्राव्य किर्तन

दि. शनिवार, ११ फेब्रुवारी २०२३.

लघुरुद्र आणि कलशारोहण, महाआरती, महाप्रसाद.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार, दिपप्रज्वलन व शिवपाठ, रात्रौ १०:०० वा. केदारनाथ नमन मंडळ गुडेकरवाडी सावर्डे, चिपळूण यांचे नमन संपन्न होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम स्वयंभू श्री सांब मंदिर पाटगाव, ता. संगमेश्वर, येथे होणार असून गावकरी, मानकरी यांच्यासह भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page