
संगमेश्वर- संगमेश्वर तालुक्यातील कडवई बौद्ध विकास मंडळ, स्थानिक ग्रामस्थ व मुंबई येथील बौद्ध बांधवांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अशोकचक्र स्तंभ उद्घाटन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम नुकताच आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी आमदार शेखर निकम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बौद्ध संस्कृतीचा सामाजिक समतेच्या दृष्टीने असलेला महत्त्वाचा संदेश अधोरेखित केला. तसेच, स्तंभ उभारणीसाठी जागा देणाऱ्या अमिना जुवळे यांचे त्यांनी विशेष आभार मानले. कार्यक्रमाला प्रज्ञानंद महाथेरो, राजेंद्र सुर्वे, दत्ता ओकटे, कडवई सरपंच सहदेव सुवरे, राहीन कडवईकर, राहील जुवळे, हरिश्चंद्र पवार, बाबूराव मोहिते, संदेश सागवेकर, संतोष गमरे, उदय मोहिते, अशोक गमरे, संजय कांबळे, सुनिल मोहिते, रवि कांबळे, सुगंधा मोहिते, रुमा कांबळे, महेंद्र कांबळे, राजू कांबळे, संदिप कांबळे, रतिश कांबळे, अभय कदम, संतोष कांबळे, शशिकांत कांबळे, शेखर कांबळे, वसंत कांबळे, सुरेश गमरे, शंकर कदम तसेच मुंबई व कडवई परिसरातील असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.