नावेरी परिसरातील शापोआ सेविकांच्या न्याय्य मागण्या शासनदरबारी मांडणार. – उल्का विश्वासराव यांचे प्रतिपादन.

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | राजापूर | ऑक्टोबर १०, २०२३.

‘शालेय पोषण आहार’ योजनेच्या सेविकांनी भाजपा नेत्या, राजापूर-लांजा-साखरपा सह-प्रमुख सौ. राजश्री (उल्का) विश्वासराव यांची भेट घेत आपली कैफियत मांडली. यामध्ये अतिशय तुटपुंज्या मानधनात वाढत्या महागाईच्या काळात सेवा देणे जड जात असल्याने मानधन वाढवून मिळावे, सेवानिवृत्त झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन चालू करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली. नवीन सेविकांना सेवेत कायम करणे, ठेकेदार हे पद रद्द करण्यात यावे अशा स्वरूपाच्या मागण्या घेऊन आलेल्या शापोआ सेविकांना दिलासा देण्याचा प्रयत्न यावेळी सौ. विश्वासराव यांनी केला. आपण शासनाच्या माध्यमातून तुमच्या मागण्या पूर्ण करण्याचा जरूर प्रयत्न करू असे आश्वासनही दिले.

यावेळी चर्चेसाठी आलेल्या महिलांमध्ये सौ. मधुशा जाधव, सौ. रंजिता शेलार, सौ. ज्योती रायकर, सौ. सुष्मा होरे, सौ. दिक्षा खामकर, सौ. दर्शना धुळप आदी शालेय पोषण आहार सेविकांचा समावेश होता.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page