करंगळीची उंची पाहूनच घ्या; नकळत इतरांनाही कळेल तुमच्या मनात चाललंय काय

Spread the love

Personality Test : First Impression is the last impression असं अनेकजण अनेक प्रसंगांना, अनेक व्यक्तींना अनुसरून म्हणतात. काहींसाठी ही बाब लागू असते, काही मात्र याला अपवाद ठरतात. अनेकदा व्यक्तीचा स्वभाव त्याच्याशी संवाद साधून लक्षात येतो आणि अनेकदा व्यक्तीची देहबोलीच त्यांच्या स्वभावाविषयी खूप काही सांगून जाते. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या व्यक्तीमत्वाशी इतका एकरुप होतो की जाणून तुम्हीही थक्क व्हाल. जाणून आश्चर्य वाटेल, पण हाताची करंगळीसुद्धा तुमच्याबद्दल खूप काही सांगून जाते. (Personality From Length of Your little fingure read details)

करंगळी अनामिकेच्या पहिल्या जोडाच्या वर असल्यास… 

तुमची करंगळी अनामिकेच्या पहिल्या जोडापासून काहीशी उंच असेल तर, तुम्ही प्रामाणिकपणे सर्व नाती निभावणाऱ्यांपैकी एक आहात. तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांसाठी जीव ओतणाऱ्यांपैकी एक आहात. पण, अनेकदा स्वभावामुळं या व्यक्तींना फटका बसतो. अधिक स्पष्टवक्तेपणा असल्यामुळं त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागतो. 

अनामिकेच्या शेवटच्या जोडापर्यंत करंगळी न पोहोचल्यास 

तुमची करंगळी अनामिकेच्या दुसऱ्या जोडापर्यंत पोहोचत नाहीये का? तुम्ही दिलखुलास व्यक्तीमत्त्वं असणाऱ्यांपैकी एक आहात. प्रचंड आशावादी असल्यामुळं तुम्ही अनेक नवे प्रयोग करता. अनेकदा काही अशी आव्हानं स्वीकारता ज्यासाठी तुम्ही ओळखले जाता. संकटांना तोंड देऊन त्यातून नव्यानं काहीतरी घडवणं यामध्ये तुमचा हातखंड आहे. अनेकांसाठी तुम्ही आदर्शस्थानी असता. 

करंगळी आणि अनामिकेचा पहिला जोड एकत्र असणं 

तुम्ही गर्दीच्या ठिकाणी एकटं राहणं पसंत करणाऱ्यांपैकी आहात. अनेकदा घोळक्यामध्ये तुम्हाला वावरता येत नाही, ज्यामुळं तुम्ही सहसा स्वत:मध्येच रमता. कलेवर तुमचं विशेष प्रेम. अफाट वाचन असल्यामुळं तुम्ही अनेकदा इतरांपुढे चांगला युक्तीवाद मांडता. समाजाकडून वेळप्रसंगी अवहेलना होऊनही तुम्ही मात्र तुमच्या रागावरील ताबा हरवत नाही. प्रचंड समजुतदारपणा असल्यामुळं तुम्ही अनेकांच्या आवडीचे असता.

 जाहिरात :

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page