
रत्नागिरी दि ३ जुलै- येथील पत्रकार अरुण सुनील आडिवरेकर यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय काेकण विभागीय शि. म. परांजपे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. याबद्दल भाजपा रत्नागिरी (मध्य)च्या नाचणे येथील पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
शासनाच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयातर्फे सन २०१९ ते सन २०२३ या कालावधीतील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांची घाेषणा करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरीतील पत्रकार अरुण आडिवरेकर यांना सन २०२२ चा राज्यस्तरीय काेकण विभागीय शि. म. परांजपे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भाजपा रत्नागिरी (मध्य)च्या नाचणे येथील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन विशेष सत्कार केला.
यावेळी मुन्ना पारकर, शशिकांत कुरुप, प्रवीण सावंत, दत्ता घडशी, अरविंद माेरे, सुधीर भाेरे, सुनील आडिवरेकर, दिलीप रेमुळकर, सुनील नाचणकर, समीर सावंत उपस्थित हाेते. सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन अरुण आडिवरेकर यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.