
रत्नागिरी : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी तालुक्याच्या वतीने किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ च्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन करण्यात आले.* भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ वायरल झाल्याने सर्व सामान्य जनतेत आक्रोश पाहायला मिळत आहे. नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सर्वत्र होत आहे. बेंबीच्या देठापासून बेटी बचाओ, बेटी पढाओ म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांच्या अशा कृत्यामुळं बेटी को भाजपा से बचाओ असं दुर्दैवानं म्हणण्याची वेळ आली आहे. त्याबद्दल आज शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी अंगीकृत संघटनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक यांनी रत्नागिरी आठवडा बाजार येथे शिवसेना जिल्हा कार्यालय येथे जोडो मारो आंदोलन केले आहे. त्याप्रसंगी जिल्हाप्रमुख विलास चाळके, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, उप जिल्हाप्रमुख संजय साळवी, समनव्यक संजय पूनसकर, तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी, आबा घोसाळे, राकेश साळवी, शेखर घोसाळे, महेंद्र झापडेकर, अभय खेडेकर, प्रसाद सावंत, श्वेता फाळके, संध्या कोसुंबकर, दीपा जाधव, रशिदा गोदड, पूजा जाधव, साक्षी रावणाग, मनीषा बामणे, रंजना ढेपसे, राजश्री शिवलकर, बावा चव्हाण, महेश पत्की, किरण तोडणकर, संदीप सुर्वे व शिवसैनिक उपस्थित होते.