IND vs ENG 3rd Test Match Updates : रांची येथे भारत आणि इंग्लंड संघांतील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने जो रुटच्या शतकाच्या जोरावर ७ बाद ३०२ धावा केल्या आहेत. जो रूट १०६ धावा करून नाबाद परतला. तर, ओली रॉबिन्सन ३१ धावा करून क्रीजवर आहे. या सामन्यात भारताकडून पदार्पणवीर आकाश दीपने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंडने सात गडी गमावून ३०२ धावा केल्या आहेत. सध्या ऑली रॉबिन्सन ३१ धावांवर नाबाद असून जो रूट १०६ धावांवर नाबाद आहे. दोघांमध्ये ५७ धावांची भागीदारी झाली आहे. आज पहिले सत्र भारताच्या नावावर होते. आकाश दीपच्या तीन विकेट्सने इंग्लंडच्या आघाडीच्या फळी उखडून टाकली. त्याने बेन डकेट (११), ऑली पोप (०) आणि जॅक क्रोली (४२) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर अश्विनने जॉनी बेअरस्टोला पॅव्हेलियनमध्ये तर रवींद्र जडेजाने बेन स्टोक्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवून इंग्लंडचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. बेअरस्टोला ३८ तर स्टोक्सला तीन धावा करता आल्या.
लंचपर्यंत पहिल्या सत्रात इंग्लंडने पाच विकेट गमावून ११२ धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या सत्रात म्हणजेच चहापानाच्या वेळेपर्यंत जो रूट आणि बेन फॉक्स यांनी एकही विकेट पडू दिली नाही. त्या सत्रात दोघांनी मिळून ८६ धावा जोडल्या. तिसऱ्या सत्रानंतर म्हणजेच चहाच्या वेळेनंतर सिराजने टीम इंडियाचे पुनरागमन केले. त्याने रूट आणि फॉक्सची ११३ धावांची भागीदारी मोडली. ज्यामुळे फॉक्सचे अर्धशतक हुकले. तो ४७ धावा करून सिराजच्या चेंडूवर झेलबाद झाला.
जो रुटने झळकावले ३१ वे कसोटी शतक –
त्याचवेळी टॉम हार्टले १३ धावा करून सिराजच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला.यानंतर रूटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३१ वे शतक झळकावले. त्याने ऑली रॉबिन्सनसह इंग्लंडचा डाव सांभाळला आहे. भारताकडून आतापर्यंत आकाशने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी सिराजला दोन विकेट मिळाल्या. रवींद्र जडेजा आणि अश्विनला प्रत्येकी एक विकेट मिळाली. तिसऱ्या सत्रात इंग्लंडने 29 षटकांत दोन गडी गमावून 104 धावा केल्या.