पदवीधरांना मुंबईत नोकरीची संधी! BMC अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु,

Spread the love

मुंबई महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे महापालिकने सहाय्यक प्राध्यापक, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. मुंबई महानगरपालिका भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मुंबई महानगरपालिका भरती २०२३

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, डेटा एंट्री ऑपरेटर

एकूण पदसंख्या – १९

शैक्षणिक पात्रता –

  • सहाय्यक प्राध्यापक – DM/DNB/MD/MS
  • डेटा एंट्री ऑपरेटर – पदवीधर, MS-CIT मराठी आणि इंग्रजी, टायपिंग काम, ६ महिने कामाचा अनुभव आवश्यक.

(शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – ३८ ते ४३ वर्षे

अर्जाची पद्धत – ऑफलाईन

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डिस्पॅच विभाग, तळमजला, टी. एन. मेडिकल कॉलेज आणि नायरची जी बिल्डिंग हॉस्पिटल, मुंबई – ४००००८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ आणि २३ नोव्हेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/

पगार –

  • सहाय्यक प्राध्यापक – १ लाख रुपये महिना.
  • डेटा एंट्री ऑपरेटर – १५ हजार रुपये महिना.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page