
Bombay High Court : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आह. मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदभरती अंतर्गत लिपिक पदाच्या एकूण ५० जागा भरण्यात येणार आहेत. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे ही भरती होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयात लॉ क्लर्क भरती अंतर्गत प्रिंसिपल सिट अॅट बॉम्बे येथे २७ जागा, नागपूर येथे ९ जागा आणि औरंगाबाद येथे १४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार लॉची परीक्षा ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे, किंवा कायद्यातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांना लॅपटॉप हाताळण्याचे किमान ज्ञान असावे.
उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही. उमेदवरांना दरमहा ४० हजार रुपये पगार दिला जाईल. २० मार्च ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी १७ ते २४ एप्रिल दरम्यान मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
असा करा अर्ज
मुंबई उच्च न्यायालय कायदा लिपिक भरती २०२३ ( Mumbai High Court Law Clerk Recruitment 2023) साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज रजिस्टार, उच्च न्यायालय, अपील बाजू, पाचवा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जीटी हॉस्पीटल कंपाऊंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफेट मार्केटजवळ, एल.टी मार्ग, मुंबई- ४००००१ येथे पाठवायचे आहेत. अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
