ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरातील लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत असताना येथील नागरिकांच्या व महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दिवा शहरासाठी पालिकेचे स्वतंत्र सुसज्य १०० बेडचे रुग्णालय तसेच महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यात यावे याकरिता दिवा भाजपच्या महिला अध्यक्षा ज्योती पाटील या एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत.
महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालयाचा आग्रह त्यामागील कारण दिव्यात सामान्य कुटुंबात राहणारा व्यक्ती ज्याला दिव्यातील खाजगी रुग्णालयाचे दर परवडत नाहीत तसेच रात्री अपरात्री आपत्कालीन गरज पडल्यास कळवा किंवा डोंबिवली शहरापर्यंत पायपीट करावी लागते सध्या दिवा शहरातील आरोग्यसार्वजनिक रुग्णालय नाही. दिवा शहराला रुग्णालय मिळावे या मागणीसाठी दिवा प्रभाग समितीकार्यालय येथे ज्योती पाटील लक्षवेधी आंदोलन करणार आहेत.
सर्वसामान्यांच्या समस्येकडे लक्ष वेधनणयासाठी दिवा
प्रभाग समितीच्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन
करण्याचा ठाम निर्णय ज्योती पाटील यांनी घेतला आहे. १० एप्रिलला सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ज्योती पाटील पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करणार आहेत.
दिवा शहरासाठी स्वतंत्र सुसज्ज रुग्णालय पालिकेने सुरू करावे या मागणीसाठी हे आंदोलन असणार असल्याचे ज्योती पाटील यांनी सांगितले आहे.अलीकडेच ज्योती पाटील यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे दिवा शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली होती. दिवा शहरातील गर्भवती महिलांना उपचारासाठी ठाणे डोंबिवली या शहरात जावे महिलांना वेळेत उपचार मिळत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन दिवा शहरासाठी स्वतंत्र महिला रुग्णालय उभारण्यात यावे ही मागणी ज्योती पाटील यांनी केली होती. त्याचबरोबर दिवा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना वेळेत मोफत उपचार मिळावेत यासाठी दिवा शहरात स्वतंत्र १०० बेडचे रुग्णालय उभारण्यात यावे याकरिता मागणी भाजपच्या ज्योती पाटील यांनी केली होती. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी व पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिवा प्रभाग समिती खर्डी येथील कार्यालयासमोर दि.१० एप्रिल रोजी आंदोलन करणार आहेत, असे ज्योती राजकांत पाटील यांनी म्हटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.comवर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा
भ्रमणध्वनी क्र.९८१९९४६९९९/८९२८६२२४१६