
संगमेश्वर- गटशेती प्रोत्साहन व सबलिकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणारी योजना, सन 2018-19 अंतर्गत पुर्ये तर्फे देवळे, गावातील जय भवानी सेंद्रिय शेती गटाच्या संदर्भातील, माहिती व अहवाल, ची मागणी उपविभागीय(आत्मा )कृषि अधिकारी चिपळूण याच्या कडे केली असता, त्यांनी अजुन पर्यंत चौकशीचा अहवाल दिलेला नसल्याचं भूपाल काबदुले यांनी म्हटले आहे.
चिपळूण उपविभागीय(आत्मा) कृषि अधिकारी यांना वारंवार ई-मेल द्वारा मेल केला असून सुद्धा, त्या ई-मेल चा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देण्यात येत नाही आहे.असंही भूपाल काबदुले यांनी म्हटलं आहे.
पुर्ये तर्फे देवळे गावाच्या नावाने आणलेली योजनेत,12 सदस्य बनवून आणि 12 सदस्यांच्या नावावर लोन काडून जय भवानी सेंद्रिय नावाचा गट चालू करून त्या मध्ये 60/40 च्या सबसिडी ने लाखोमध्ये पैसे कृषि विभाग कडून घेऊन, अध्यक्ष व सरचिटणीस यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे.आणि 12 सदस्यामधील एक सदस्य म्हणजे अर्जदार दशरथ भोवड यांचे अडकलेले पैसे ही देण्यात आलेले नाही व सेंद्रिय गटाचा बँकेचा चेक (cheque)दशरथ भोवड जी यांच्या नावे दिलेला होता तो ही चेक (cheque)बाउन्स करण्यात आलेला आहे.
चिपळूण उपविभागीय (आत्मा )यांच्या कडे वारंवार चौकशी चा अहवाल ची मागणी करून सुद्धाही, अर्जदार दशरथ भोवड यांना प्रतिसाद देण्यात आलेला नाही आहे,असा आरोप भूपाल काबदुले यांनी केला आहे.