
खेड परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून जगबुडी नदीने पुराची पातळी ओलांडली आहे
1.बोरघर (कातकरी वस्ती) येथील 4 घरांना पाणी लागले असल्याने 4 घरांतील 22 लोकांना त्याच वस्तीतील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहे.
- मौजे भोस्ते गावातील रस्त्यावर जगबुडी नदीचे पाणी आल्याने भोस्ते-अलसुरे वाहतूक सद्यस्थितीत बंद आहे. अलसुरे येथील मजिदीचे भोंग्यावरून नागरिकांना सुरक्षित स्थळी राहणेबाबत सुचित केले आहे, सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे चालू आहे.
3.खेड शहरातील जगबुडी नदीने पुराची पातळी ओलांडली असून, खेड शहरात मच्छी मार्केट भागात पुराचे पाणी भरले आहे. तेथील दुकानदार यांनी दुकाने बंद करून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत. - नारिंगी नदीचे पुराचे पाणी कन्या शाळा जवळ रस्त्यावर आले असल्याने दापोली खेड रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे.
- आंबावली येथील धनगर वाडी कडे जाणाऱ्या रस्त्याला भेगा पडल्या असून रस्त्यांवर झाड पडले आहे.रस्ता बंद केला आहे.
- खारी गावात पुराचे पाणी येण्याची शक्यता असल्याने शेजारील घरात 4 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
- खेड खांब तळे येथील झोपड पट्टी मधील नागरिक यांना नगर पालिका बालवाडी येथील शाळेत शिफ्ट केले आहे.
- जगबुडी नदी बाजूस असलेली झोपडपट्टी मधील लोकांना मुकादम हायस्कूल मध्ये स्थलांतर करण्यात आले आहे
9.जगबुडी नदी पातळी दुपारी 12.07 वाजता 10.80 मी.असून खेड शहरातील गांधीचौक, डेंटल कॉलेज, नगर परिषद दवाखाना रोड याठिकाणी अंदाजे 3 फूट पाणी भरले आहे. सदरचे ठिकाणी तलाठी , पोलीस व नगर परिषद कर्मचारी यांची पथके तैनात केलेली आहेत. खेड तालुक्यातील मार्केट परिसरातील दुकानामधील साहित्य दुकानदारांकडून हलविण्यात आले असून सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत.
10.डेंटल कॉलेजजवळून जाणारा खेड दापोली रोड वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. - नगर परिषद हद्दीत 5बोटी खेड शहरात तैनात असून अलसुरे येथे 1 बोट तैनात करण्यात आली आहे. तेथील नारिकांना सुरक्षीत ठिकाणी हलवण्यात आले आहे.
- आतापर्यंत खेड परिषद हद्दीतील 35 कुटुंबातील 80 सदस्यांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
12.अलसुरे ग्रामपंचायतीसमोर असणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे तसेच असलुरे या गावचा संपर्क तुटला आहे.
13.तळवटखेड व तळवट जावळी यांना जोडण्याऱ्या पुलावरून पूराचे पाणी जात असल्याने सदरची वाहतूक बंद करण्यात आली आहे.