
रत्नागिरी जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शनिवारी 482 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत तर जगबुडी, कोदवली यासह काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जून महिन्यानंतर जुलै महिन्यात ही मुसळधार पाऊस होत आहे. ठिकठिकाणी रस्तेही खचले जात आहेत. सकल भागात पाणी साचत आहे. तसेच घाटावर दरड कोसळत आहे. त्यामुळे कित्येक ठिकाणी वाहतूक दुसर्या मार्गाने वळविण्यात येत आहे. दुसरीकडे शेतकर्यांनी भात लागवडीसाठी लगबग सुरू केली असून 90% हून अधिक खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
*मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले…*
जुलै महिन्यात शनिवार दि. पाच जुलै रोजी एकाच दिवशी 485 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या आठवड्यात आणखी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही तालुक्याला पुराचा फटका ही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठा परिसरातील नागरिकाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
*खेडमध्ये मुसळधार; जगबुडी नदी धोका पातळीवर…*
मुसळधार पावसाचा इशारा
पुढील काही तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार 45 कि.मी. प्रति तास वेगाने पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.