चांगल्या कर्माची फळं चागलीचं मिळतात,वाचा डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट

Spread the love

फोटो सौजन्य-गुगल

एक शेतकरी आपल्या गावामधून शहराच्या बाजारात लोणी विकण्यासाठी जायचा.एका दुकानदाराला त्याचे लोणी खूप आवडले.दुकानदाराने शेतकऱ्याला दररोज एक किलो लोणी घेऊन ये असे सांगितले.शेतकरी सुद्धा हे ऐकून खुश झाला.शेतकऱ्याने त्याच दुकानातून एक किलो साखर आणि इतर वस्तूंची खरेदी केली आणि सामान घेऊन तो घरी आला.

दुसऱ्या दिवसापासून शेतकरी दररोज दुकानावर एक किलो लोणी देऊ लागला. दुकानदारही दररोज शेतकऱ्याला लोण्याचे पैसे देत होता. काही दिवस असेच चालू राहिले. एका दिवशी दुकानदाराने,शेतकऱ्याने दिलेल्या लोण्याचे वजन केले तर ते ९०० ग्रॅमच भरले. दुकानदाराला खूप राग आला. पैसे एक किलोचे घेतो आणि लोणी ९०० ग्रॅमच देतो, हे दुकानदाराला अजिबात आवडले नाही. शेतकरी फसवणूक करत आहे असा विचार त्याच्या मनात आला.

दुसऱ्या दिवशी शेतकरी लोणी घेऊन दुकानात आल्यानंतर दुकानदाराने त्याच्या समोरच लोण्याचे वजन केले तर ते ९०० ग्रॅमच भरले. आता मात्र दुकानदाराच्या क्रोधाचा पारा अधिकच वाढला. तो शेतकऱ्यावर ओरडून म्हणाला,’ मला धोका देत आहेस’ शेतकरी म्हणाला,अहो भाऊ, माझ्याकडे वजन करण्यासाठी एक किलोचे मापच नाही. तुमच्याकडून जी एक किलो साखर खरेदी केली होती, त्याचे माप बनवूनच मी लोणी मोजून आणतो.” शेतकऱ्याचे हे उत्तर ऐकून दुकानदाराची मान शरमेने खाली गेली, कारण तो स्वतःचं चुकीचे काम करत होता. त्याच्या लक्षात आले की, आपण जसे कर्म करतो तसेच फळ आपल्याला मिळते.

कथेची शिकवण-आपण चुकीचे काम केल्यास आपल्याला त्याचे फळही तसेच मिळते.

के.डी.सर, ग्रंथापल
उमरगा, धाराशीव

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page