श्रीहरिकोटा- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आज शनिवारी INSAT-3DS उपग्रह यशस्वीपणे लॉन्च केला आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून भारताला हवामानाची अचूक माहिती गोळा करणे सोपे होणार आहे.
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेईकल F14 (GSLV-F14) वर लॉन्च करण्यात आले. या उपग्रहाचे वजन 2,274 किलो आहे. या उपग्रहाचे मिशन लाइफ 10 वर्षे आहे. म्हणजेच हा उपग्रह पुढील दहा वर्षे हवामान बदलांची माहिती देत राहील. या उपग्रहावर सुमारे 500 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
एकदा वर्किंग मोडमध्ये आल्यावर, ते वादळ तसेच जंगलातील आग, हिमवर्षाव, धूर आणि बदलते वातावरण याबद्दल माहिती देईल. या उपग्रहाचा उद्देश पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या आणि महासागर निरीक्षणांच्या अभ्यासाला चालना देणे हा आहे. दरम्यान, याचे प्रक्षेपण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आली होती. रॉकेटने उड्डाण करताच लोकांनी टाळ्या वाजवत जल्लोष साजरा केला. इस्रोने सांगितले की, 2,274 किलो वजनाचा उपग्रह भारतीय हवामान विभागसह पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विविध विभागांना सेवा देईल. 1 जानेवारी रोजी PSLV-C58/Exposet मिशनच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर 2024 मध्ये ISRO ची ही दुसरी मोहीम आहे.