दबाव वृत्त : ठाणे पुणे वैद्यकीय क्षेत्र असो किंवा मुंबई ठाणे तर आता शालेय शिक्षणातही कट, गेल्या काही वर्षांपासून शाळांनी काढलेल्या परिपत्रकानुसार ठराविक दुकानातूनच पालकांना गणवेश, वह्या-पुस्तके अन् इतर शालेय साहित्यांची खरेदी करावी लागत आहे. अशाप्रकारे सक्ती केली जात असल्याने दुकानदारही मार्केटपेक्षा अधिक दराने शालेय साहित्याची विक्री करत आहेत. यासाठी शाळांना दुकानदारांकडून १० ते २० टक्के कमिशन मिळत असल्याचे सांगितले जात आहे. शाळांनी शिक्षणाचा खुलेआम मांडलेला हा बाजार पालकांच्या मुळावर उठला असून, पालकांची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे. ज्ञानदानाचे काम करणाऱ्या खासगी शाळाचे या दुकानदारांच्या ‘दलाल’ बनल्याने दाद कुणाकडे मागायची?असा प्रश्न पालकांना पडला आहे.विशेष म्हणजे या प्रकरणात शासन मूग गिळून गप्प बसले आहे. शासनाचे ना खासगी शाळांच्या प्रवेश शुल्कावर नियंत्रण, ना मनमानी कारभारांवर. शिक्षणसम्राटांच्या शाळांमध्येही हीच स्थिती असल्याने ‘दिव्याखाली अंधार’ असेच म्हणावे लागेल.
वस्तुस्थिती काय?
■ खासगी शाळांच्या निकाला दिवशीच कोणत्या दुकानातून गणवेश घ्यावा, याची माहिती पालकांनादिली जाते. या शाळांशी ‘टायअपअसलेली काही ठराविक दुकाने आहेत. पालकांना गणवेशासाठी दहा ठिकाणी फिरावे लागू नये म्हणून केलेली ती सोय आहे. त्याकडे सक्ती म्हणून पाहू नये. वह्या पुस्तके
खरेदीसाठीही आम्ही शाळांमध्ये स्टॉल मांडतो.पालकांची गैरसोय होऊ नये एवढाच हेतू असतो. संस्थाचालक

■ तेथूनच गणवेश घेतला तर ठीक,अन्यथा शहर फिरले तरी दुसरीकडे गणवेश मिळणार नाही, अशी विशिष्ट यंत्रणाच तयार करण्यात आली आहे. याच दुकानांमधून गणवेश घेण्याची पालकांना सक्ती केली जाते.साटेलोटे असल्याची चर्चा गेल्या काही वर्षापासून खासगी शाळांनी स्वतःचे स्वतंत्र शैक्षणिक धोरणच राबवणे सुरू केले आहे. शहरात एप्रिल ते जुलै या कालावधीत शुल्क,स्टेशनरी, गणवेश आणि स्कूल बससह इतर शालेय खर्च अशी मिळून कोटींच्या घरात उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. शाळा, स्टेशनरी व्यावसायिक आणि शिक्षण यंत्रणेने संपूर्ण शिक्षण क्षेत्रच पोखरले गेले आहे. शाळा व्यवस्थापन आणि काही मोजके स्टेशनर्स यांचे साटेलोटे
■ पावसाळ्यात मुलांसाठी दोन गणवेशघेणे भाग पडते यातच पीटीचा गणवेशदेखील घ्यावा लागतो.गणवेशासह शालेय साहित्याची खरेदीही सहा ते सात हजारांच्या घरातजाते. त्याच्याबरोबरच शाळांचे भरमसाठ शुल्क आहेच.शालेय साहित्य खरेदी ठराविक दुकानांमधूनचकरण्याची सक्ती केली जात असल्याबद्दल अद्याप एकाही पालकाने आमच्याकडे तक्रार केलेली नाही. तशी तक्रार आल्यास नक्कीच तातडीने अशा शाळांवर कारवाईकेली जाईल. संबंधित विभाग अशा शाळांची चौकशी करेल.
– सूरज मांढरे, राज्य शिक्षण आयुक्त
