IPL 2023: आयपीएलचा थरार शुक्रवारपासून रंगणार; गुजरात टायटन्स-चेन्नई सुपर किंग्जमध्ये पहिली लढत

Spread the love

IPL 2023: आयपीएलचा थरार शुक्रवारपासून रंगणार; गुजरात टायटन्स-चेन्नई सुपर किंग्जमध्ये पहिली लढत

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२३च्या १६व्या पर्वाचा थरार शुक्रवारपासून सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जची (Chennai Super Kings) लढत रंगणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे यंदा आयपीएलची १३ भाषांमध्ये कॉमेंट्री होणार आहे.

पाच वर्षानंतर आयपीएलचा उद्धाटन सोहळा

२०१८मध्ये आयपीएलचा शेवटचा उद्घाटन सोहळा झाला होता. २०१९मध्ये पुलवामा हल्ल्यातील हुतात्मांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या बलिदानाच्या सन्मानार्थ आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला होता. त्यानंतर कोरोना महामारीमुळे २०२०मध्ये उद्घाटन सोहळा झाला नाही. त्यामुळे पाच वर्षानंतर यंदा आयपीएलचा उद्घाटन सोहळा बॉलिवूड तडकासह धूमधडाक्यात होणार आहे. या सोहळ्यात अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, तमन्ना भाटिया, कतरिना कॅफ, टायगर श्रॉफ आणि गायक अरिजित सिंह परफॉर्म करणार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ६.३० वाजता या सोहळ्याला सुरुवात होणार असून त्यानंतर यंदाच्या पर्वामधला पहिला सामना रंगणार आहे.

गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ

हार्दिक पंड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, रिद्धिमान साहा, साई सुदर्शन, दर्शन नालकांडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अल्झारी जोसेफ, मोहम्मद अहमद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विल्यमसन, जोशुआ लिटल, ओडियन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.

चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण संघ

महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापती, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, भगत वर्मा, मोईन अली, राजवर्धन हंगेरगेकर, शिवम दुबे, दीपक चहर, महेश ठीकशाना, मुकेश चौधरी, प्रकाश सोळंकी, सिमरजीत सिंग, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथिशा पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधू, काइल जैमिसन आणि अजय मंडल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page