
गुजरातने नाणेफेक जिंकत मुंबईला (IPL 2023 MI vs GT) प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले.
मुंबई ,13 मे 2023- यंदाचा आयपीएल (IPL 2023 MI vs GT) हंगाम हा बऱ्याच गोष्टींसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. कधी सामन्यानंतरच्या वादामुळे र कधी सामन्यातील थरारक खेळीमुळे. अशातच शुक्रवार १२ रोजी मुंबई आणि गुजरात या दोन संघांमध्ये सामना रंगला. यावेळी सूर्यकुमार यादव याच्या वादळी खेळीमुळे मुंबईने गुजरातवर (IPL 2023 MI vs GT) विजय मिळवला.
गुजरातने नाणेफेक जिंकत मुंबईला (IPL 2023 MI vs GT) प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार मुंबईने गुजरातसमोर तब्बल २१९ धावांचे आव्हान दिले. एकट्या सूर्यकुमारने ४९ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकार ठोकून १०३ धावांची नाबाद खेळी केली. यंदाच्या आयपीएलमधील सूर्यकुमार याचं हे पहिलं शतक आहे.
यावेळी मुंबईचे गोलंदाज (IPL 2023 MI vs GT) गुजरातच्या फलंदाजांवर भारी पडले. गुजरातने ८ विकेट्स गमावत एकून १९१ धावा केल्या. रशिद खानची ७९ धावांची खेळी निरर्थक ठरली. गुजरातवर मिळवलेल्या विजयानंतर मुंबई १२ गुणांसह पॉईंट टेबलवर तिसऱ्या स्थानी येऊन पोहोचली आहे.