१० लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या,सोहळ्यासाठी ७१४० जणांना निमंत्रण…

Spread the love

*अयोध्या:* ज्या क्षणाची अवघ्या देशाला प्रतीक्षा होती, तो क्षण अवघ्या काही तासावर येऊन ठेपला आहे. सोमवारी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. प्राणप्रतिष्ठेआधी सुरु झालेल्या पूजाविधीचा आजचा सहावा दिवस आहे. प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी राममंदिर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजले आहे.

रामलला प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी प्रत्येक रामभक्त आतूर आहे. या ऐतिहासिक क्षणाचा अवघा देश साक्षीदार होणार आहे. यावेळी अयोध्येमध्ये खास दिपोत्सवही पाहायला मिळणार आहे. प्रभू श्रीरामाची नगरी अयोध्या लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळून निघणार आहे.

राम मंदिरात 22 जानेवारीला रामललाचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अभिषेक सोहळ्यानंतर संध्याकाळी अयोध्या नगरी दिव्यांनी सजवली जाईल. यावेळी अयोध्येत 10 लाख दिवे लावण्याची तयारी सुरू आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाल्यानंतर 22 जानेवारीच्या संध्याकाळी अयोध्या 10 लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे. शरयू नदीच्या काठावर मातीपासून बनवलेल्या दिव्यांनी अयोध्या उजळून निघणार आहे. याशिवाय, अयोध्येतील घर, दुकाने, आस्थापना आणि पौराणिक स्थळांवर ‘रामज्योती’ प्रज्वलित करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात आनंदाचं आणि उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सात हजार 140 निमंत्रक हजेरी लावणार आहेत. शिवाय 112 परदेशी पाहुणेही या भव्य सोहळ्यात सहभागी होणार आहेत. रामनगरी अयोध्येत 150 चार्टर्ड विमान उतरणार आहेत. मोठ्या व्हिव्हीआयपी घडामोडींमुळे अयोध्यानगरीला छावणीचं रुप आलं आहे. येथे जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विना निमंत्रण कुणालाही अयोध्येत परवानगी नाही. याशिवाय अयोध्येवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. दरम्यान, अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांना राममंदिर ट्रस्टतर्फे भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

संपूर्ण जिल्ह्यात 10 हजार सीसीटीव्ही

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाबाबत विशेष महानिदेशक प्रशांत कुमार यांनी माहिती देताना सांगितलं की, “आम्ही प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्तही असेल. सुमारे 10,000 सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. यावेळी पोलीस यंत्रणेत मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून सर्वत्र नजर ठेवली जात आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t  कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*

*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*

*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी  7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*

*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav  वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page