ठाकरेंच्या दिल्लीत दौऱ्यात या जागा वाटप आणि मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत त्यांनी काँग्रेस हायकमांडशी चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र काँग्रेस हायकंमाडने अद्याप मुख्यमंत्री पदाबाबत चेहरा जाहीर करण्यास नकार दिल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
🔹️न्यूज पॉईंट-
▪️ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात काय ठरलं?..
▪️जागा वाटप आणि मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत बैठकीत चर्चा..
▪️विधानसभा निवडणूक एकत्र मिळून लढूया…
नवी दिल्ली- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सूरू केली आहे. या दरम्यान शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिल्ली दौऱ्यावर गेले होते. इंडिया आघाडीच्या (India Alliance) घटक पक्षांची भेट घेण्यासाठी हा दौरा होता. तसेच या दौऱ्यात या जागा वाटप आणि मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत त्यांनी काँग्रेस हायकमांडशी चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र काँग्रेस हायकंमाडने अद्याप मुख्यमंत्री पदाबाबत चेहरा जाहीर करण्यास नकार दिल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेस हायकमांडने देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यास नकार दिला…
उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र त्यांच्या या वक्तव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौरा करून पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत काँग्रेसच्या हायकमांडची चर्चा केली होती. मात्र महाराष्ट्र काँग्रेसने आधीच याबाबची कल्पना काँग्रेस हायकमांडला दिली होती. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यास नकार दिला आहे.
नेत्यांच्या भेटीत त्यांनी जागावाटप आणि मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा केली….
तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरून उद्धव ठाकरे गुरुवारी संध्याकाळी मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी दिल्ली दौऱ्यात ठाकरेंनी इंडिया आघाडीच्या अनेक प्रमुख नेत्यांची भेट घेतली. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. या दोन्ही नेत्यांच्या भेटीत त्यांनी जागावाटप आणि मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा केली. या चर्चेतून मुख्यमंत्री पदावरून फारसा काही तोडगा निघू शकला नाही.
त्यानंतर ठाकरे यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि ज्येष्ठ वकील आणि खासदार कपिल सिब्बल यांची भेट घेतली होती.
विधानसभा निवडणूक एकत्र मिळून लढूया आणि त्यांनतर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा करू…
दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी स्वत:ला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शरद पवारांप्रमाणे काँग्रेसने देखील स्पष्ट केले की, विधानसभा निवडणूक एकत्र मिळून लढूया आणि त्यांनतर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा करू या. पण याआधी जागावाटपाला प्राधान्य देऊ या, असे ठरले होते.
महिन्याच्या अखेरीस महाविकास आघाडीमधील जागावाटप निश्चित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला….
याआधी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली. या भेटीत महिन्याच्या अखेरीस महाविकास आघाडीमधील जागावाटप निश्चित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आणि निवडणुकाजवळ येईपर्यंत ती ताणू नका. यासोबतच जाहीरनामा आणि संयुक्त प्रचाराच्या रणनीतीवरही चर्चा झाली होती.