विजेचा धक्का बसून गंभीर जखमी…

Spread the love

लांजा :  घराचे पेंटिंगचे काम करत असताना हातातील ओल्या बांबूचा महावितरणच्या उच्च दाब वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून एकजण गंभीर जखमी होण्याची घटना लांजा शहरातील गोंडेसखल रोड येथे घडली आहे.
     

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तुकाराम केशव मिरजोळकर (राहणार वडदहसोळ) हे बुधवारी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास लांजा शहरातील गोंडेसखल रोड येथील घराचे पेंटिंगचे काम करत असताना त्यांच्या हातामध्ये असणाऱ्या ओल्या बांबूचा स्पर्श महावितरणच्या उच्च दाब वाहिनीला झाल्याने त्यांना विजेचा प्रचंड धक्का बसला. ते कंपाऊंडच्या लोखंडी रेलिंग वरुन पडून खाली ग्रीलवर आपटले. त्यानंतर त्यांना प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालय आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती मिळतात लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि घटनेची माहिती घेतली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page