
ठाणे : प्रतिनिधी गणेशोत्सव म्हणजे सर्व कोकणवासीयांसाठी आनंदाची पर्वणी! गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याचे वेध चाकरमान्यांना तीन-चार महिने आधीपासूनच लागतात. तिकीट काढण्यासाठी ते रात्र-रात्र तिकिटाच्या रांगेत उभं राहतात, पण तरीही बुकिंग सुरु होताच पहिल्या मिनिटातच परराज्यातले दलाल सर्व तिकिटे बुक करतात. परिणामी कोकणी बांधवांचा तिकीट न मिळाल्यामुळे भ्रमनिरास होतो.

कोकण रेल्वेची संपूर्ण बुकिंग व्यवस्था दलालांच्या हाती गेली असून दरवर्षी हीच परिस्थिती उद्भवते आणि तरीही रेल्वे मंत्रालयाला या प्रकरणाचे जराही गांभीर्य नाही. यामुळे दलालांचे फावते आणि ते मालामाल होतात, पण माझ्या कोकणी बांधवांना मात्र वर्षानुवर्षे याची झळ सोसावी लागत आहे.
या प्रकरणात वेळीच लक्ष घालावे आणि गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आत्ताच नियोजन करावे अशी विनंती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा. श्री. रावसाहेब दानवे यांना पत्राद्वारे केली. आतातरी या प्रकरणावर तोडगा निघून गौरीगणपती निमित्त कोकणात जाणाऱ्या बांधवांचा प्रवास सुखाचा आणि आरामदायी होईल अशी आशा !
जाहिरात
