
रत्नागिरी (प्रतिनिधी) : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे शनीवारी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
▶️शनिवार, १ जुलै २०२३ रोजी पहाटे ४.४५ वाजता कोकण कन्या एक्सप्रेसने (गाडी नं. २०१११) रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण.
▶️पहाटे ५.१५ वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.
▶️सकाळी ८.३० वाजता लेन्स आर्ट ग्रुप, रत्नागिरी आयोजित माऊली मनामनातली छायाचित्र प्रदर्शनास भेट (स्थळ: विठ्ठल मंदिर, रत्नागिरी).
▶️सकाळी ९.०० वाजता जिल्हापरिषद सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय देयकासंदर्भात आढावा बैठक (स्थळ : जिल्हा परिषद सभागृह, रत्नागिरी)
▶️सकाळी ११.३० वाजता आरोग्य वर्धिनी केंद्र बुरंबी नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती.
( स्थळ : बुरंबी, ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी)
▶️दुपारी १२.३० वाजता बहुजनांचे कैवारी विलास होडे यांचा २५ वा स्मृतिदिन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : कुणबी भवन, केशवसृष्टी (चोरपऱ्याजवळ), देवरूख, जि.रत्नागिरी).
▶️दुपारी १.०० वाजता जनता दरबार (स्थळ : पंचायत समिती सभागृह, देवरुख, ता. संगमेश्वर)
▶️दुपारी २.३० वाजता ते ३.३० वाजता राखीव.
▶️सायंकाळी ४.१५ वाजता लांजा नगर पंचायत हद्दीतील केदारलिंग मंदिर तळी सुशोभिकरण तसेच गावमंदिरे दर्शन.
(स्थळ : लांजा नगर पंचायत, ता. लांजा जि. रत्नागिरी).
▶️सायंकाळी ४.४५ वाजता श्री साई अनिरूद्ध सोसायटी, पाली संचलित डी.जे.सामंत इंग्लिश मिडीयम स्कूल, लांजा प्रस्तावित इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : सारस्वत वसाहत, लांजा).
▶️सायंकाळी ५.१५ वाजता शिवसेना लांजा तालुका संपर्क कार्यालय उद्घाटन समारंभास उपस्थिती व लांजा शहर ग्रामस्थांसोबत भेट व विविध विकासकामांबाबत चर्चा (स्थळ : सातारा शॉपिंग सेंटर, लांजा हायस्कूल समोर, ता. लांजा जि. रत्नागिरी)
▶️सायंकाळी ६.०० वाजता लांजा नगरपंचायत हद्दीतील पथदिपांचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ : शिवाजी चौक, ता. लांजा, रत्नागिरी)
▶️सोईनुसार लांजा येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण. रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.
▶️रात्रौ 10.50 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे प्रयाण.
▶️रात्रौ 11.15 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व कोंकणकन्या एक्सप्रेसने (गाडी नं.२०११२) ने मुंबई कडे प्रयाण.