इंद्रधनु मित्रमंडळातर्फे दिव्यात २८ मार्च रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे आयोजन…

Spread the love

दिवा शहर – रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दिवा येथील इंद्रधनु मित्रमंडळ यांच्यावतीने गुरुवार दि.२८ मार्च रोजी चारभुजा दुकान,शिळ रोड दिवा पुर्व येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे.सदरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून सकाळी १० वा.शिवप्रतिमेचे पूजन, सायं ५ वाजता शिवप्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे.

त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन कृष्ण तृतीया दिवशीचा असल्याने यंदा तिथीनुसार शिवजयंतीचा सोहळा 28 मार्च 2024 दिवशी साजरा केला जाणार आहे. अनेक शिवभक्त या प्रमाणे तिथीनुसार शिवाजयंतीला देखील दिव्यातील शिवप्रेमी ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन आदरांजली अर्पण करणार आहेत.

यावर्षी तिथीनुसार शिवजयंती २८ मार्च रोजी येत आहे. यानिमित्त साजर्या होणार्या या भव्यदिव्य कार्यक्रमाला दिवा शहरातील जास्तीत जास्त शिवप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन इंद्रधनु मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री तुषार पाटील, उपाध्यक्ष गणेश पाटील, खजिनदार प्रशांत पाटील, सचिव भानुदास पाटील, उपसचिव प्रशांत गावडे, सुदाम भोईर,शंकर भोईर यांनी केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page