क्रीडा – 30 सप्टेंबर : एकदिवसीय विश्वचषकाचे बिगुल वाजले असून येत्या ५ ऑक्टोबरपासून महास्पर्धेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, शुक्रवारपासून एकदिवसीय विश्वचषकातील सराव सामन्यांना सुरुवात झाली. भारतीय संघ त्यांचा पहिला सराव सामना आज (३० सप्टेंबर २०२३) इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुवाहाटीमध्ये आज पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील सराव सामन्यात पावसामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सराव सामना गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, या सामन्याला दुपारी २.०० वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील या सराव सामन्याचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण होणार आहे. भारतीय चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स हिंदीवर हा सामना पाहता येईल. तर, ऑनलाइन सामना पाहणारे दर्शक डिज्नी हॉट स्टारवर हा सामना लाईव्ह पाहू शकतात.
असा आहे भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन और सूर्यकुमार यादव.
असा आहे इंग्लंडचा संघ:
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस एटकिंसन, जानी बेयरस्टा, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल राशिद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टॉप्ले, डेव्हिड विली, मार्क वूड, क्रिस वोक्स.