विश्वचषकात भारताचा सलग चौथा विजय,7 गडी राखून बांगलादेशाचा केला पराभव; कोहलीचे 48वे शतक, तर सर्वात फास्ट 26 हजार धावाही पूर्ण

Spread the love

पुणे- टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग चौथा विजय मिळवला आहे. भारतीय संघाने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. कोहलीने वनडे कारकिर्दीतील 48 वे शतक झळकावले. त्याने सर्वात जलद 26 हजार आंतरराष्ट्रीय धावाही पूर्ण केल्या आहेत. त्याने 567 डावात ही कामगिरी केली आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकरने 600 डावात ही कामगिरी केली होती.

पुण्यातील एमसीए मैदानावर नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकात 8 विकेट गमावत 256 धावा केल्या. भारतीय फलंदाजांनी 257 धावांचे लक्ष्य 41.3 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले.

विराट कोहलीचा शतकी धमाका

पुण्याच्या मैदानावर विराट कोहलीने षटकार मारुन शतक केले. विराट कोहलीने 97 चेंडूमध्ये 103 धावांची नाबाद शतकी खेळी केली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्यासोबत त्याने महत्वाच्या भागिदारी केल्या. विराट कोहलीने 103 धावांमध्ये 4 षटकार आणि सहा चौकार मारले. केएल राहुल याने 34 धावा करत विराट कोहलीला चांगली साथ दिली.. रोहित शर्माचे यंदाच्या विश्वचषकातील पहिले शतक होय. त्याशिवाय त्याने दोन अर्धशतकेही ठोकली आहेत.

बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 गडी गमावून 256 धावा केल्या. बांगलादेशाच्या सलामीच्या जोडीनं बांगलादेशला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी 93 धावांची भागीदारी केली. मात्र यानंतर भारतीय गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी करत बांगलादेशला बॅकफूटवर नेलं. बांगलादेशनं नियमित अंतरानं विकेट गमावल्या. फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर त्यांना केवळ 256 धावा करता आल्या. बांगलादेश 300+ धावा करेल असं वाटत होतं, पण त्यांना 256 धावाच करत आल्या. बांगलादेशकडून सलामीवीर लिटन दासनं 66 धावांची तर तनजीद हसननं 51 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा यांनी 2-2 विकेट घेतल्या. तसंच शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव यांनाही प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

भारताची तिसरी विकेट पडली

श्रेयस अय्यर मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरलाय. अय्यर 19 धावा काढून बाद झाला.विराट कोहलीनं विश्वचषकात तिसरं अर्धशतक झळकावलं :विराट कोहलीनं विश्वचषकात तिसरं अर्धशतक झळकावलंय. कोहलीनं पाकिस्तान वगळता सर्व सामन्यांमध्ये चांगली खेळी केलीय. त्यानं 48 चेंडूत 4 चौकार तसंच 1 षटकार मारत 50 धावा पूर्ण केल्या. यासोबतच त्यानं एकदिवसीय क्रिकेटमधील 69 वे अर्धशतक पूर्ण केलं.

शुभमन गिल अर्धशतक झळकावून बाद :

आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असताना गिल बाद झालाय. गिलनं 53 धावा केल्या.भारताला पहिला धक्का : 13व्या षटकात भारताला पहिला धक्का बसलाय. बांगलादेशचा युवा वेगवान गोलंदाज हसन महमूदनं 13व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रोहित शर्माला बाद केलंय. रोहित शर्मा तौहीद हृदयॉयच्या हाती झेलबाद झाला. बांगलादेशनं दिलेल्या 257 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल या सलामीच्या जोडीमध्ये अर्धशतकी भागीदारी झालीय.

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील 17 वा साखळी सामना आज पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू आहे. या स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्व सामने जिंकून भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघांचा दणदणीत पराभव करणाऱ्या टीम इंडियाचा तसंच सर्व खेळाडूंचा आत्मविश्वास गगनाला भिडलाय. आकडेवारीबद्दल बोलायचं झाले तर, भारतीय संघ बांगलादेशपेक्षा खूप पुढं आहे. परंतु, चिंतेची बाब म्हणजे बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या 5 पैकी 3 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे.बांगलादेशची सहावी विकेट पडली : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं 43व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मुशफिकर रहीमला रवींद्र जडेजाच्या हाती झेलबाद केलंय.

भारताला पाचवं यश :

तौहीद हृदय 16 धावांवर बादभारताला तौहीद हृदयची पाचवी विकेट मिळाली. 38व्या षटकात शार्दुल ठाकूरनं तौहीद हृदयॉयला 16 धावांवर बाद केलं.

जडेजानं बांगलादेशला दिला चौथा झटका

भारताचा स्टार ऑफस्पिनर रवींद्र जडेजानं लिटन दासला 28व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बाद केलंय. त्यानं 66 धावा केल्यानंतर त्याची शुभमन गिलनं कॅच घेतली.सिराज पव्हेलियनमध्ये :भारताला बांगलादेशची तिसरी विकेट मिळवण्यात यश आलं आहे. भारताचा कीपर केएल राहुलनं सिराजचा शानदार झेल घेत त्याला पव्हेलियनमध्ये पाठवलंय. यावेळी भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराजच्या गोलंदाजी करत होता.

बांगलादेशला 110 धावांवर दुसरा धक्का

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू गोलंदाज रवींद्र जडेजानं संघाला दुसरी विकेट मिळवून दिलीय. कर्णधार नजमुल हसनला जडेजानं बाद केलय.कुलदीपनं घेतली पहिली विकेट :गोलंदाज कुलदीप यादवनं पहिली विकेट घेतलीय. त्यानं सलामीवीर तनजीद हसनला बाद केलय. या सामन्यात तनजीदनं वनडेतील पहिले अर्धशतक झळकावल्यानंतर त्याला यादवनं 51 धावांवर बाद केलं.

चुरशीच्या सामन्याची अपेक्षा :

बांगलादेशबद्दल बोलायचं झालं तर २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशनं आतापर्यंत तीनपैकी फक्त 1 सामना जिंकलाय. बांगलादेशनं अफगाणिस्तानविरुद्ध ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवून स्पर्धेची विजयी सुरुवात केली. पण, त्यानंतर त्यांना इंग्लंड आणि न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघांकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. भारताविरुद्धच्या सामन्यात बांगलादेश विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. मात्र, त्यांचा मार्ग सोपा नाही कारण त्यांचा सामना भारतासारख्या बलाढ्य संघासमोर आहे. आज दोन्ही संघांमध्ये चुरशीच्या सामन्याची क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहे.
या सामन्यात बांगलादेशनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही, तर बांगलादेशच्या संघातही 2 बदल करण्यात आले आहेत.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन :

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह

बांगलादेश : लिटन दास, तंजीद तमीम, मेहदी हसन मिराज, नजमुल हसन शान्तो (कर्णधार), मुश्फिकुर रहीम (यष्टिरक्षक), तौहिद हृदॉय, महमुदुल्लाह, मुस्तफिजुर रहमान, शोरिफुल इस्लाम, नसून अहमद, हसन महमूद

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page