*भारतीय ऑलिम्पिक संघटनेने पॅरिस ऑलिंपिक २०२४ साठी भारतीय खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्याचबरोबर पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे संपूर्ण वेळापत्रक कसे असणार जाणून घ्या.*
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला यत्या २६ जुलैपासून सुरूवात होत आहे. भारतीय खेळाडू पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये पदकांची कमाई करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे ११७ खेळाडू सहभागी होत आहेत. पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या एक दिवस आधी २५ जुलै रोजी भारत आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. भारतीय तिरंदाज पहिल्या दिवशी मैदानात उतरणार आहेत.
२७ जुलै रोजी भारताचे बॅडमिंटनपटू, बॉक्सिंग, टेबल टेनिस, नेमबाजी, नौकानयन, हॉकी आणि टेनिस संघ मैदानात उतरणार आहेत. चाहत्यांना पुन्हा एकदा नीरज चोप्रासारख्या प्रतिभावान खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा असेल. गेल्या वेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण ७ पदके जिंकली होती. यावेळी भारतीय खेळाडूंची नजर पदकांची संख्या वाढवण्यार आहे. ११ ऑगस्टला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मोहिमेची सांगता होणार आहे. ११ ऑगस्ट रोजी भारतीय बॉक्सर आणि कुस्तीपटू पदकासाठी मैदानाक उतरतील. आता पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे संपूर्ण वेळापत्रकही समोर आले आहे. पाहा कसं असणार आहे भारतीय खेळाडूंचं वेळपत्रक.
भारताचा हॉकी संघ आणि बॅडमिंटनपटूंकडून देशाला पदकांची निश्चितता आहे. भारताचे बॅडमिंटनचे गट सामने हे २७ तारखेपासूनच सुरू होणार आहेत. तर मेडल मॅच या ३ ऑगस्टपासून सुरू होतील. त्याप्रमाणे हॉकीचे सामनेही २७ जुलैपासून सुरू होणार आहेत. भारतीय संघ बेल्जियम, अर्जेंटिना, आयर्लंड, न्यूझीलंड या संघांविरूद्ध सामने खेळणार आहे. तर हॉकीचे पदकासाठीचे सामने ६-७ ऑगस्ट खेळवले जातील.
*▶️दिनांक- खेळ- वेळ (भारतीय प्रमाणवेळेनुसार)-*
🔹️२५ जुलै-
▪️ तिरंदाजी (रँकिंग राऊंड) दुपारी- १ :00
🔹️२६ जुलै —
🔹️२७ जुलै
▪️बॅडमिंटन (गट सामने) दुपारी १२.५० पासून
▪️रोईंग दुपारी १२.३० पासून
▪️शूटिंग दुपारी १२.३० पासून
▪️बॉक्सिंग (R32) संध्याकाळी ७ पासून
▪️हॉकी (भारत वि न्यूझीलंड) रात्री ९ वाजता
▪️टेबल टेनिस संध्याकाळी ६.३० पासून
▪️टेनिस (R1) संध्याकाळी ५.३० पासून
🔹️२८ जुलै
▪️तिरंदाजी (टीम मेडल मॅच) दुपारी १ पासून
▪️बॅडमिंटन दुपारी १२ पासून
▪️बॉक्सिंग (R32) दुपारी २.४६ पासून
▪️रोईंग दुपारी १.०६ पासून
▪️शुटिंग (मेडल मॅच) दुपारी १.०६ पासून
▪️पोहणे दुपारी २.३० पासून
▪️टेबल टेनिस (R62) दुपारी १.३० पासून
▪️टेनिस (R1) दुपारी ३.३० पासून
🔹️२९ जुलै
▪️तिरंदाजी (टीम मेडल मॅच) दुपारी १ पासून
▪️बॅडमिंटन दुपारी १.४० पासून
▪️हॉकी (भारत वि अर्जेंटिना) दुपारी ४.१५ वाजता
▪️रोईंग दुपारी ०१.०० पासून
▪️शूटिंग दुपारी १२.४५ पासून
▪️टेबल टेनिस (R32) दुपारी १.३० पासून
▪️टेनिस (R2)
🔹️३० जुलै
▪️पोहणे (मेडल मॅच) मध्यरात्री १२.५२ वाजता
▪️तिरंदाजी दुपारी ०३.३० पासून
▪️बॅडमिंटन दुपारी १२.०० पासून
▪️बॉक्सिंग दुपारी ०२.३० पासून
▪️अश्वारोहण दुपारी ०२.३० पासून
▪️हॉकी (भारत वि. आयर्लंड)
▪️संध्याकाळी ४.४५ वाजता
▪️रोईंग दुपारी ०१.४० पासून
▪️शूटिंग (मेडल मॅच) दुपारी ०१.०० पासून
▪️टेबल टेनिस (R32) दुपारी ०१.०० पासून
▪️टेनिस (R2) दुपारी ०३.३० पासून
🔹️१ ऑगस्ट
▪️तिरंदाजी दुपारी १ पासून
▪️अॅथलेटिक्स रात्री ११ पासून
▪️बॅडमिंटन दुपारी १२ पासून
▪️बॉक्सिंग दुपारी ०३.३० पासून
▪️गोल्फ दुपारी १२.३० पासून
▪️हॉकी (भारत वि. बेल्जियम) दुपारी ०३.३० वाजता
▪️रोईंग दुपारी ०१.२० पासून
▪️सेलिंग दुपारी ०३.३० पासून
▪️शुटिंग (मेडल मॅच) दुपारी १ पासून
▪️टेबल टेनिस दुपारी ०१.३० पासून
▪️टेनिस दुपारी ०३.३० पासून
🔹️२ ऑगस्ट
▪️तिरंदाजी दुपारी १ पासून
▪️अॅथलेटिक्स रात्री ९.३० पासून
▪️बॅडमिंटन (उपांत्य फेरी) दुपारी १२ पासून
▪️बॉक्सिंग संध्याकाळी ७ पासून
▪️गोल्फ दुपारी १२.२० पासून
▪️हॉकी (भारत वि ऑस्ट्रेलिया) संध्याकाळी ४.४५ वाजता
▪️ज्युडो (मेडल मॅच) दुपारी १.३० पासून
▪️रोईंग (मेडल मॅच) दुपारी १ पासून
सेलिंग दुपारी ३.३० पासून
▪️शुटिंग दुपारी १२.३० पासून
▪️टेबल टेनिस (उपांत्य फेरी) दुपारी १.३० पासून
▪️टेनिस (मेडल मॅच) दुपारी ३.३० पासून
🔹️३ ऑगस्ट
▪️तिरंदाजी (मेडल मॅच) दुपारी १ पासून
▪️अॅथलेटिक्स (शॉट पुट फायनल) रात्री ११.०५ वाजता
▪️बॅडमिंटन (मेडल मॅच ) दुपारी १२ पासून
▪️बॉक्सिंग संध्याकाळी ७.३२ पासून
▪️गोल्फ दुपारी १२.३० पासून
▪️रोईंग (मेडल मॅच) दुपारी १.१२ पासून
▪️सेलिंग दुपारी ३.३० पासून
▪️शूटिंग (मेडल मॅच) दुपारी १ पासून
▪️टेबल टेनिस (मेडल मॅच) संध्याकाळी ५ पासून
▪️टेनिस (मेडल मॅच) वेळ निश्चित नाही
🔹️४ ऑगस्ट
▪️तिरंदाजी (मेडल मॅच) दुपारी १ पासून
▪️अॅथलेटिक्स दुपारी ३.३५ पासून
▪️बॅडमिंटन (मेडल मॅच) दुपारी १२ पासून
▪️बॉक्सिंग (उपांत्यपूर्व/उपांत्य फेरी) दुपारी २.३० पासून
▪️अश्वारोहण (अंतिम फेरी) दुपारी १.३० वाजता
▪️गोल्फ (मेडल मॅच) दुपारी १२.३० वाजता
▪️हॉकी (उपांत्यपूर्व फेरी) दुपारी १.३० पासून
▪️सेलिंग दुपारी ३.३० पासून
▪️शुटिंग (अंतिम फेरी) दुपारी १२.३० पासून
▪️टेबल टेनिस (मेडल मॅच) संध्याकाळी ५ पासून
🔹️५ ऑगस्ट
▪️अॅथलेटिक्स (५ किमी अंतिम फेरी) रात्री १०.३४ पासून
▪️बॅडमिंटन (मेडल मॅच) दुपारी १.१५ पासून
▪️सेलिंग दुपारी ३.३० पासून
▪️शूटिंग (अंतिम फेरी) दुपारी १ वाजता
▪️टेबल टेनिस दुपारी १.३० पासून
▪️कुस्ती संध्याकाळी ६.३० पासून
🔹️६ ऑगस्ट
▪️अॅथलेटिक्स (लांब उडी अंतिम फेरी) दुपारी १.५० पासून
▪️बॉक्सिंग (उपांत्य फेरी) दुपारी २ पासून
▪️हॉकी (उपांत्य फेरी) संध्याकाळी ३.३० पासून
▪️सेलिंग (मेडल मॅच) दुपारी ३.३० पासून
▪️टेबल टेनिस दुपारी ४ पासून
▪️कुस्ती (मेडल मॅच) दुपारी २.३० पासून
🔹️७ ऑगस्ट
▪️अॅथलेटिक्स (३ किमी अडथळा शर्यत अंतिम फेरी) सकाळी ११ पासून
▪️बॉक्सिंग रात्री १ पासून
▪️गोल्फ दुपारी १२.३० वाजता
▪️सेलिंग सकाळी ११ वाजता
▪️टेबल टेनिस दुपारी १.३० वाजता
▪️वेटलिफ्टिंग (४९ किलो वजनी गट अंतिम फेरी) रात्री ११ वाजता
▪️कुस्ती (मेडल मॅच) दुपारी २.३० वाजता
🔹️८ ऑगस्ट-
▪️अॅथलेटिक्स (भालाफेक अंतिम फेरी) दुपारी १.३५ पासून
▪️गोल्फ दुपारी १२.३०
हॉकी (मेडल मॅच) संध्याकाळी ५.३० पासून
▪️टेबल टेनिस दुपारी १.३० पासून
▪️कुस्ती दुपारी २.३० पासून
🔹️९ ऑगस्ट
▪️बॉक्सिंग (अंतिम फेरी) दुपारी १.३२ पासून
▪️अॅथलेटिक्स (मेडल मॅच) दुपारी २.१० पासून
▪️गोल्फ दुपारी १२.३० वाजता
▪️हॉकी (मेडल मॅच) दुपारी २ वाजता
▪️कुस्ती (मेडल मॅच) दुपारी २.३० वाजता
🔹️११ ऑगस्ट-
▪️बॉक्सिंग (मेडल मॅच) दुपारी १ पासून
▪️कुस्ती (मेडल मॅच) दुपारी २.३० पासून