
संगमेश्वर: अर्चिता कोकाटे/ नावडी- नावडी येथील स्टेट बँकेचे शाखाधिकारी श्रीकृष्ण मसने यांनी उत्कृष्ट ग्राहकांचा सन्मान केला. यावेळी जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते श्री. उदय संसारे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बँकेचे कर्मचारी श्री.भागवत, श्री.साळुंखे, श्री. प्रणय गुरव व ग्राहक उपस्थित होते.
बँकेचे शाखाधिकारी व कर्मचारी ग्राहकांना चांगली सेवा देत आहेत. असे उद्गार यावेळी जेष्ठ नागरिक व ग्राहक उदय संसारे म्हणाले. अजून काही ग्राहकांचे सन्मान करावयाचे आहे असे शाखाधिकारी श्रीकृष्ण मसने प्रतिनिधी यांच्याशी बोलताना म्हणाले. तसेच काही ग्राहक लोन देखील चांगल्या पद्धतीने परतफेड करीत असल्याचे म्हणाले.