भारतानं ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सनं हरवून विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. भारतीय संघ आता २ नोव्हेंबर रोजी अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे.
नवी मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सनं पराभव केला. भारतानं मागील विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करून त्यांचं विश्वचषकाचं स्वप्न धुळीस मिळविलं आहे. दुसरीकडं भारतानं विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. 2 नोव्हेंबर रोजी भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
उपांत्य फेरीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 338 धावांचा मोठा आकडा उभारला. महिला विश्वचषक इतिहासातील हा सर्वाधिक धावांचा पाठलाग ठरला. उपांत्य जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद 127 आणि हरमनप्रीत कौरच्या 89 धावांच्या खेळीमुळे भारताला विजय मिळविणं शक्य झाला. भारतानं 9 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून ऑस्ट्रेलियाल धोबीपछाड केली आहे.
339 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताची सुरुवात दमदार नव्हती. प्रतिका रावलच्या दुखापतीनंतर संघात सामील झालेली शेफाली वर्मा सपशेल अपयशी ठरली. तिनं फक्त 10 धावा मिळविल्यानं क्रिकेट चाहत्यांची निराशा केली. 10 व्या षटकात स्मृती मानधनानं आपली विकेट गमावल्यानंतर भारताची चिंता वाढली होती. संघाची मदार असलेल्या मानधनाननंदेखील 24 धावा केल्या. मात्र, हरमनप्रीत आणि जेमिमा यांच्या दमदार फलंदाजीनं भारताच्या बाजून विजय खेचून आणला. दोघीनी 18 व्या षटकात भारताचा धावसंख्या 100 च्या पुढे नेत शतकी भागीदारी करून विजयाच्या उबंरठ्यावर संघाला नेलं. आयसीसी महिला विश्ववषकाच्या अंतिम सामन्याचं तिकीट मिळवण्यासाठी टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियानं 339 धावांचं आव्हान ठेवलंय. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियानं 49.5 षटकांत सर्वबाद 338 धावा केल्या होत्या.
*पावसाच्या सावटाखाली ऑस्ट्रेलयाल पहिला धक्का…*
नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर ढगाळ वातवरणातही टॉस जिंकून ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सकाळपासून पडलेल्या पावसामुळे पिचवर थोडासा ओलावा असताना गोलंदाजांना सुरूवातीला मदत मिळणार होती. मात्र नंतर खेळपट्टी अगदीच स्लो होऊन धावा करणं गोलंदाजासाठी सोपं होणार होतं. कर्णधार एलिहा हीलीचा हा निर्णय योग्यही ठरला. मात्र, पावसामुळे खेळ थांबणार असं चित्र असतानाच पाचव्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलव टीम इंडियाची फास्ट ट्रेन क्रांति गौडनं हीलीचा त्रिफळा उडवून भारताला पहिलं यश मिळवून दिलं. पावसामुळे खेळानं काहीकाळ विश्रांती घेतली.
*पाऊस ओसरताच नवी मुंबईत कांगारू बरसले…*
पावसाच्या विश्रांतीनंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी मैदानावर चांगलच जम बसवला. दुसऱ्या विकेटसाठी होबे लिचफिल्डनं सामन्याची सूत्र हाती घेत एलिस पेरीसह 155 धावांची भागीदारी रचली. यात या जोडीनं अवघ्या 128 चेंडूत 150 धावा फटकावल्या आहेत. अखेर अमरज्योत कौरनं लिचफिल्डचा अडसरदूर करत ही जोडी फोडली. लिचफिल्डनं 93 चेंडूत 119 धावांची खेळी केली. यात 17 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर एलिस पेरीनं एक बाजू लावून धरली होती. अखेर राधा यादवनं 40 व्या ओव्हरमध्ये पेरील क्लीन बोल्ड करत माघारी धाडलं. एलिस पेरीनं 88 चेंडूत 77 धावांची खेळी केली. यात 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. अखेरच्या 10 षटकांत दोन्ही बाजूंना नवे फलंदाज आल्यानंतरही अपेक्षित धावगती राखण्यात कांगारूंना यश आलं. 46 षटकांत ऑस्ट्रेलियानं स्कोअर बोर्डवर 300 धावा लावल्या होत्या. अॅशले गार्डनरनं पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध करत 45 जेंडूत 66 धावांची वेगवान खेळी केली. यात 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. एक चोरटी धाव घेण्याच्या नादात गार्डनरला क्रांती गौडच्या अचूक थ्रोन रन आऊट केलं. 50 षटकांत ऑस्ट्रेलियानं सर्वबाद 338 पर्यंत मजल मारली. अखेरच्या 10 चेंडूत ऑस्ट्रेलियानं 4 विकेट्स गमावल्या.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*



