भारतीय संघानं T-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 44 धावांनी पराभव केला. या मालिकेत टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर हा सलग दुसरा विजय आहे. या विजयासह संघानं मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
तिरुवनंतपुरम – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना तिरुवनंतपुरम येथे खेळला गेला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकांत 4 गडी गमावून 235 धावा केल्या. भारताकडून यशस्वी जैस्वाल, इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांनी अर्धशतकं झळकावली. ऋतुराजनं सर्वाधिक 58 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून एलिसनं २ बळी घेतले.
भारताला धमाकेदार सुरुवात…
यशस्वी जैस्वालनं भारताला धमाकेदार सुरुवात करून दिली. 77 धावांवर भारतानं पहिला विकेट गमावली. यशस्वी जैस्वालनं 25 चेंडूत झटपट 53 धावा केल्या. यानंतर रुतुराज गायकवाड आणि इशान किशन यांच्यात 87 धावांची भागीदारी झाली. इशान किशननं 32 चेंडूत 52 धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव 10 चेंडूत 19 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सलामीवीर रुतुराज गायकवाड 43 चेंडूत 58 धावा करून बाद झाला. रिंकू सिंगनं तुफानी खेळी केली. त्यानं अवघ्या 9 चेंडूत 31 धावा केल्या. टिळकने 2 चेंडूत 7 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला.
प्लेइंग इलेव्हन :
भारत (प्लेइंग इलेव्हन):
यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसीद कृष्णा.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन) :
स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर/कर्णधार), शॉन ॲबॉट, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, तन्वीर संघा.