पुणे- भारताने चौथ्या टी 20 सामन्यात इंग्लंडला हरवून मालिकाही जिंकली आहे. इंग्लंडने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागांत दमदार सुरुवात केली होती. पण तरीही अखेर त्यांना चौथ्या टी २० सामन्यात पराभव पत्करावा लागला. भारताने संयमी खेळ करत यावेळी फक्त चौथा टी २० सामनाच नाही तर मालिकाही आपल्या नावावर केली आहे. कारण चारपैकी तीन सामने जिंकत भारताने या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे.
शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांनी मोक्याच्या क्षणी अर्धशतकं झळकावली. या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताला प्रथम फलंदाजी करताना १८१ धावा करता आल्या. भारताच्या १८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची दमदार अर्धशतकी सुरुवात झाली होती. पण त्यानतर इंग्लंडचे फलंदाज एकामागून एक बाद होत गेले आणि भारताने इंग्लंडवर १५ धावांनी विजय साकारला. भारताच्या १८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने अर्धशतकी सलामी दिली होती. त्यामुळे इंग्लंड हा सामना जिंकेल, असे त्यावेळी वाटत होते. पण त्यावेळी भारतीय संघासाठी धावून आला तो रवी बिश्नोई. रवीने यावेळी प्रथम बेन डकेटला बाद केले, त्याने ३९ धावा केल्या. रवीने त्यानंतर जोस बटलरला दोन धावांवर बाद केले आणि भारताला मोठे यश मिळवून दिले.
पण त्यानंतर हॅरी ब्रुक हा भारताच्या विजयात मोठा अडसर बनलेला होता. पण त्याला वरुण चक्रवर्तीने बाद केले आणि सामना भारताच्या बाजूने झुकला. भारतीय संघाला दुसऱ्याच षटकात तीन धक्के बसले आणि भारताचा डाव गडगडेल, त्यांच्या धावांवर अंकुश बसेल, असे वाटत होते. कारण इंग्लंडच्या साकिब महमूदने एकाच षटकात हे तीन पण रिंकू सिंगने यावेळी भारताला या पडझडीतून बाहेर काढले. पण रिंकूला मोठी खेळी साकारता आली नाही. रिंकूने यावेळी ४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३० धावांची दमदार खेळी साकारली. रिंकू बाद झाल्यावर भारतावरचे दडपण वाढेल, असे वाटत होते. पण त्यानंतर शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांची दमदार भागीदारी झाली आणि त्यामुळे भारताला धावांचा डोंगर उभारता आला. शिवम आणि हार्दिक यांनी पाचव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी रचली आणि त्यामुळेच भारताला १८१ धावांपर्यंत मजल मारता आली. शिवमने यावेळी ३४ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली. हार्दिनेहीही यावेळी ३० चेंडूंत ५३ धावा केल्या, यामध्ये चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.