लिटिल स्टार प्ले स्कूल येथे स्वतंत्र दिन साजरा….

Spread the love

संगमेश्वर:- नावडी येथील लिटिल स्टार प्ले स्कूल च्या वतीने 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
त्यावेळी मान्यवर म्हणून प्रमुख अतिथी वीर पत्नी श्रीमती शालिनी हरिभाऊ अंब्रे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व ध्वजाला मानवंदना देण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व झेंडा गीत व राज्य गीत गायली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठित व्यापारी श्री नील खातू शेठ उपस्थित होते व विशेष अतिथी सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे व माजी सैनिक पाल्य दिनेश अमरे, सामाजिक कार्यकर्ते विशाल रापटे आदी उपस्थित होते मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन स्कूल संचालिका सौ राजश्री धनंजय भांगे यांनी स्वागत केले.

अध्यक्ष निल शेठ खातु यांनी मनोगत व्यक्त केले तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे यांनी स्वतंत्र सैनिक देशासाठी प्राणांचे बलिदान केलेले शहीद सैनिक व माजी सैनिक सैनिकांचा खडतर जीवन प्रवास पोलीस दल व शासकीय अधिकारी यांचे स्मरण सदोदित रहावे हे त्याग व समर्पणाची भावना असलेले मौलिक विचार यावेळी मनोगत व्यक्त केले.
स्कूलच्या श्रीमती रहाटे ताई पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

महात्मा गांधी सावित्रीबाई फुले सैनिक विविध वेशभूषा करून सर्वधर्मसमभाव विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले व भाषण केली.आभार सौ राजश्री भांगे यांनी मानले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page