*रत्नागिरी/ प्रतिनिधी-* रत्नागिरीत जिल्हा परिषदेने शिक्षक भरती न झाल्याने व आंतर जिल्हा बदलीतील शिक्षकांना कार्यमुक्त केल्यामुळे शाळा उघडायला सुद्धा शिक्षक उपलब्ध नव्हते. त्यामुळे कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.या शिक्षकांनी कायम शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मानधन तत्त्वावरील शिक्षक सहभागी झाले आहेत.
आंदोलन कर्ते आंदोलनावर ठाम असून कायम शिक्षण सेवक नियुक्ती मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलन कर्त्याचे संयोजक सुदर्शन मोहिते यांनी सांगितले.