कर्जत: सुमित क्षिरसागर – कर्जत मतदार संघात शिवसेना उबाठा पक्षाचे नितीन सावंत, शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आणि अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. कर्जत मध्ये ३,१८,७४२ मतदार आहेत. त्या मध्ये २,४००१० म्हणजे ७५ टक्के मतदान इतके झाले आहे.या मतदार संघातील कर्जत नगरपालिका खोपोली नगरपालिका खालापूर नगरपंचायत माथेरान नगरपंचायत तसेच मतदारसंघातील ग्रामीण भागात मोठ्या संख्येने मतदार आहेत. येथील मतदारांनी सकाळ पासून मतदानासाठी गर्दी केली होती. सकाळचा सत्रात मतदान करण्यावर या भागातील मतदारांचा कल दिसून आला. तर ग्रामीण भागातील मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते प्रयत्न करताना दिसले.
कर्जत मतदार संघात पहिल्या दाेन तासांत ६.५ टक्के मतदान झाले. ११ वाजेपर्यंत २२.७४ टक्के मतदानाची नोंद झाली. सकाळच्या सत्रात ७४,४७४ मतदारांनी मतदान केले. दुपारी एक वाजेपर्यंत ४०.१६ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाचा वेग मंदावला. तीन वाजेपर्यंत ५६.०८ टक्के मतदान झाले. १,७८,७४७ मतदारांनी हक्क बजाविला. पाच वाजेपर्यंत २,२३,७८३ मतदारांनी आपला हक्क बजाविला. हि मतांची टक्केवारी ७०.२१ टक्के हाेती. पुर्ण मतदार संघात एकूण ७५.३०टक्के मतदान म्हणजे २४००१० इतके मतदान झाले.
बीड बुद्रूक मतदान केंद्रांवरील गोंधळ वगळता… मतदार संघात शांततेत मतदान पार पडले…
बीड बुद्रूक मतदान केंद्रांवरील अधिकारी मतदान करणाऱ्या मतदारांना १ नंबर चे बटन दाबा अस सांगत असल्याचा दावा करत याबाबत ग्रामस्थांनी निवडणूक अधिकारी प्रशांत संकपाळ तक्रार केली असता त्या अधिकाऱ्याला इतर ठिकाणी पाठवून हा वाद मिटवला.
मतदान पार पडल्यावर प्रत्येक उमेदवार आपआपल्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला बूथ वर किती मतदान झाले याची बेरीज वजाबाकी करण्यात व विजयाची गणित मांडताना दिसत होते. नेरळ मध्ये तिन्ही उमेदवाराचा कार्यकर्त्यांकडून मतदान संपल्यावर फटाके वाजून आपणच विजयी ये दाखवण्यात आले. त्यालामुळे सामन्य मतदारांची निकाला बदलची उत्सुकता वाढलेली आहे. कर्जत मतदार संघात मतदानाची वाढलेली टक्केवारी बगता मतदारांनी कुठल्या उमेदवाराच्या पारड्यात आपलं मतदान टाकल आहे हे येत्या २३ तारखेला चित्र स्पष्ट होईल.