लांजा : लांजा नगर पंचायत क्षेत्रातील अपूर्ण अवस्थेत असलेली विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच पूर्ण केली जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते आमदार डॉ. राजन साळवी यांनी दिली.
गेली अनेक महिने निधी उपलब्ध असतानादेखील नगराध्यक्षांसहीत शिंदे गटात सहभागी झालेल्या नगरसेवकांनी विकास कामांच्या निविदा काढल्या नाहीत. मंजूर झालेला निधी परत कसा जाईल याकडे त्यांनी ल दिले. सुमारे ९ कोटी १५ लाख रुपयांचा निधी परत जावू नये यासाठी आपण नगरविकास विभागाच्या सचिवांची भेट घेतली. त्यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा निर्णय झाल्याची माहिती आ. राजन साळवी यांनी दिली.
जाहिरात