✒️ जनशक्तीचा दबाव न्यूज
🛑 रत्नागिरी | जानेवारी ३०, २०२३.
◼️ रत्नागिरी आरोग्य मंदिर ते पॉवर हाऊस लिंक रोड येथे श्री. विजय निकम यांच्या ‘विजय एंटरप्रायझेस’ गृहसजावट साहित्याच्या अत्याधुनिक दालनाचा शुभारंभ भाजपा नेते, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
◼️ यावेळी रत्नागिरीमधील अनेक मान्यवर श्री. विजय निकम यांच्या नवीन व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. नवीन घराला अथवा फ्लॅटमध्ये टाईल्सला उत्तम पर्याय म्हणून वा घर, दुकान सजवण्यासाठी विजय एंटरप्रायझेसच्या माध्यमातून ग्राहक नक्कीच समाधान प्राप्त करतील असा नावलौकिक प्राप्त कराल अशा शुभेच्छा बाळासाहेब माने यांनी दिल्या.