माजी आमदार श्री सुभाष भोईर यांची प्रमुख उपस्थिती
दिवा (प्रतिनिधी ) दातिवली नंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचा उद्धघाटन सोहळा रविवार दि.26 मार्च 2023 रोजी सायं.5 वाजता दिव्यातील एन.आर.नगर (पश्चिम) येथे माजी आमदार श्री सुभाष भोईर यांच्या हस्ते होणार असून या निमीत्ताने बहुसंख्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा उद्घाटन सोहळा कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख आणि माजी आमदार श्री सुभाष भोईर यांच्या हस्ते पार पडणार आहे.या सोहळ्याला जिल्हाप्रमुख श्री सदानंद थरवळ, उपजिल्हाप्रमुख श्री प्रकाश म्हात्रे,ज्येष्ठ शिवसैनिक श्री राम पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक श्रीमती कविता गावंड,महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक श्रीमती सौ.वैशाली दरेकर,माजी नगरसेविका सौ.अंकिता पाटील,युवानेते सुमित भोईर,युवासेनेचे प्रतिक पाटील,सहसंपर्क प्रमुख श्री अरविंद बिरमोळे,दिवा उपशहरप्रमुख श्री सचिन पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.रमेश पाटील,महिला आघाडीच्या सौ.प्रियांका सावंत,महिला उपशहर संघटक सौ.योगिता नाईक यांच्यासह विभाग प्रमुख आणि उपविभागप्रमुख श्री चेतन पाटील,श्री मच्छिंद्रनाथ लाड,श्री गुरुनाथ नाईक,श्री राजेश भोईर,श्री संजय भोईर,श्री गुरुनाथ पाटील,श्री रमण पाटील,सौ.स्मिता जाधव,सौ.विनया कदम, शाखा प्रमुख व उपशाखाप्रमुख श्री जितेश भोईर,श्री संतोष साळवी,श्री राहूल पाटील,श्री राजेश कदम,श्री जयंत साळुंखे,श्री सचिन पारकर,श्री शशिकांत कदम,श्री मगेश शेलार,श्री अशोक अमोंडकर,श्री अजित माने,श्री नितेश पाटील,श्री कृष्णा मढवी,श्री रितेश म्हस्के,श्री अनिकेत सावंत,श्री विजय कोटकर,श्री संजय निकम,श्री सुरज सकपाळ,श्री ओमप्रकाश मिश्रा,श्री अनिल पवार,श्री संजय जाधव,श्री महेंद्र नारकर,श्री तानाजी पवार,श्री रविंद्र बाईत,श्री विलास मुलम,श्री दिपक उतेकर,श्री विलास उतेकर,श्री देवीदास तटकरे,श्री शुभम धाडवे,श्री महेंद्र शिवगण,श्री तुकाराम मोरे,श्री संतोष शिरकर,श्री निखिल कदम,श्री शंकर राणे,श्री सुभाष गोणवरे,सौ.गिता भोईर आदी पदाधिकारीही उपस्थितीत राहणार आहेत.
शिवसेना आणि ठाणे जिल्हा हे अतुट नाते आहे.पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख श्री आदित्य ठाकरे यांचे ठाणे जिल्हावर विशेष प्रेम असल्यामुळे या समारंभाला जास्तीत जास्त शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक दिवा भागातील युवासेनेचे प्रमुख श्री अभिषेक संतोष ठाकूर,शाखाप्रमुख प्रतिक म्हात्रे,शाखाप्रमुख श्री ओकेश कृष्णा भगत यांनी केले आहे.