
ऱाजापूर / प्रतिनिधी- राजापूर पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सेवेचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री ना . उदय सामंत यांच्या हस्ते शनिवारी (दि ४ नोहेंबर )पार पडला त्याप्रसंगी खासदार विनायक राऊत ,आमदार राजन साळवी यांच्यासह रेल्वे आणि पोस्ट विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थीत होते .
राजापूर पोस्ट कार्यालयात एक स्वतंत्र खिडकी सुरु करण्यात आली असुन तेथे रेल्वे आरक्षण सेवा उपलब्द करुन देण्यात आली आहे .गेली अनेक वर्षे राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सुविधा उपलब्द व्हावी अशी सातत्याने मागणी होत होती . त्या मागणीसाठी संबंधीत रेल्वे विभागाचे मंत्री महोदय वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता अन्य तालुक्यात ही सेवा यापुर्वीच सुरु झाली होती . केवळ राजापूरातच ती प्राप्त झाली नव्हती.
अखेर रेल्वे प्रशासनाने राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर अवश्यक सेवा सुविधा उपलब्द झाल्या .दरम्यानच्या काळात काही तिकीटे देखील राजापूरातुन वितरीत करण्यात आली .मात्र रेल्वे आरक्षण सेवेचा अधिकृत शुभारंभ झाला नव्हता.अखेर तो ठरविला गेला आणि शनिवारी (४ नोहेंबर)राज्याचे उद्योगमंत्री व जिल्हा पालकमंत्री ना . उदय सामंत यांच्या हस्ते रेल्वे आरक्षण सेवेचा अधिकृत शुभारंभ पार पडला त्याप्रसंगी खासदार विनायक राऊत आमदार राजन साळवी पोस्ट मास्तर ,जनरल गोवाच्या श्रीमती मरीअम्मा थॉमस ,रिजनल रेल्वे मॅनेजर ,रत्नागिरी रविंद्र कांबळे ,सिनिअर रिजनल ट्रॅफीक मॅनेजर दिलीप भट ,रत्नागिरी डाकघर विभागाचे अधिक्षक एनटी कुरळपकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थीत होते.
राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सुविधा सुरु झाल्याने समस्त तालुका वासीयान्ना त्याचा चांगला फायदा होणार आहे .