ठाणे मुरबाड प्रतिनिधी
लक्ष्मण पवार
संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर औचित्य साधून आज मुरबाड तालुक्याती शिवळे येथील विद्यार्थ्यांच्या गरज लक्षात घेऊन शिवळे कॉलेज रोडवर नवीन पांडुरंग कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट कॉम्प्युटर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी डी वाय फाउंडेशनचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष चारुशीला गायकर ठाणे पालघर विद्यासेवक पतसंस्थेचे उपाध्यक्ष धनाजी दळवी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मराठा काँग्रेसचे संस्थापक उमेश चौधरी इंटक संघटनेचे काँग्रेसचे अध्यक्ष हरिचंद्र झुंजारराव सामाजिक कार्यकर्ते गोविंद दळवी माया गोविंद दळवी रोहित झुंजारराव मलिक टेलर रिगल भाकरे करिअर टेक्निकल इन्स्टिट्यूट चे बाळाराम मोरे प्राथमिक शिक्षक पद्माकर घागस या सेंटरचे संचालक तानाजी पांडुरंग घागस योगिता घागस या क्लासच्या अनुभवी शिक्षिका अक्षदा गायकवाड मॅडम दिव्या चौधरी मॅडम नंदिनी गिरा मॅडम गायत्री चौधरी मॅडम व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते .
कॉलेजच्या अगदी बाजूलाच कॉम्प्युटर सेंटर चालू केल्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण होते अतिशय प्रसन्न वातावरणात श्री गणेश पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी उमेश चौधरी यांनी आपल्या शब्दांमध्ये पांडुरंग कृपा कॉम्प्युटर क्लास च्या सर्व टीमचा आभार व्यक्त केला ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना हा सेंटर चालू केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी विघ्नेश घागस निरज प्रजापती संजय भोईर कैलास शिंगळे कांद्याचे माजी सरपंच गुरुनाथ रोटे उपस्थित होते.