राष्ट्रवादी आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या मैदान व स्टेज कामाचा शुभारंभ

Spread the love

चिपळूण : खेर्डीतील राष्ट्रवादी युवक व युवती काँग्रेसच्या वतीने चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री.शेखरजी निकम व राष्ट्रवादी युवती काँग्रेस रत्नागिरी जिल्ह्यध्यक्ष सौ.दिशाताई दाभोळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिवर्ष प्रमाणे यावर्षी देखील खेर्डीतील पोहामील च्या मागे कै.धोंडीराम शेठ क्रिडानगरी येथे रविवार दि.२६ फेब्रुवारी ते मंगळवार दि.२८ फेब्रुवारी च्या दरम्यान खेर्डीतील राष्ट्रवादी युवक व युवती काँग्रेस पार्टी आयोजित भव्यदिव्य अशा “आमदार चषक-२०२३” या कबड्डी स्पर्धेच्या मैदान व स्टेज कामाचा शुभारंभ अनेक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडुन करण्यात आला.

यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खेर्डी गणाचे अध्यक्ष व उद्योजक श्री.नितीन ठसाळे, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष व खेर्डी ग्रामपंचायत माजी सरपंच श्री.दशरथ दाभोळकर, खेर्डी ग्रामपंचायत माजी उपसरपंच श्री.प्रसाद सागवेकर, खेर्डी ग्रा.पं सदस्य श्री.राकेश दाभोळकर, श्री.रियाजभाई खेरडकर, श्री.राजेश सुतार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खेर्डी गणाचे अध्यक्ष श्री.गणेश भुरण, व्यवसायिक श्री.धनंजय दाभोळकर, श्री.जितुभाई दाभोळकर, सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रशांत दाभोळकर, श्री.विनोद खताते, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष कु.मुबिनभाई माटवणकर, विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.शशांक भिंगारे, श्री.संदिप सुर्वे, श्री.सचिन भोसले, श्री.महेश पवार, राष्ट्रीय कबड्डी खेळाडु श्री.वैभव गुरव, समिर दाभोळकर, श्री.आकाश घाग, श्री.विलास दाते, श्री. अभिजीत खरावते, श्री.साईराज सावंत, कु.युवराज कवडे, श्री.विकी मिरगल, कु.जयेश वाडकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात :

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page