
ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने व दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणी नुसार तयार झालेल्या स्वयंचलित सरकत्या जिन्याचं आज शिवसेना शहरप्रमुख, मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मध्य रेल्वे चे विभागीय व्यवस्थापक(DRM) रजनीश गोयल यांनी देखील दिवा स्थानकाला भेट दिली व दिवा स्थानकाची पाहणी सुद्धा केली.
प्लॅटफॉर्म क्रमांक १ व २ वरील सरकत्या जिन्याचं काम लवकरच सुरू करण्याचे आश्वासन रेल्वे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी दिलं. तसेच नवीन पुलावर नवीन तिकीट घर, ATVM मशीन ची सोय करावी अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली. फलाट क्रमांक २ वर डोंबिवली दिशेला गाडी आणि फलाट यामधील अंतर जास्त असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले.
जाहिरात




