मानवाधिकार संरक्षण संघटना पदग्रहण सोहळा संपन्न.

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | फेब्रुवारी ०६, २०२३.

सुरेश सप्रे | देवरूख.

मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हात नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांचा पदग्रहण सोहळा देवरुख येथे जिल्हाध्यक्ष श्री. तेजस भोपळकर यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री. बाळकृष्ण वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.

यावेळी मंचावर जिल्हा सल्लागार श्री. मुराद मुकादम, जिल्हा महिला कार्याध्यक्ष सौ. संध्या बने, चिपळूण महिला अध्यक्षा सौ. स्वाती हडकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील विविध पदांवर नियुक्त झालेल्या नवनिर्वाचित जिल्हा पदाधिकाऱ्यांना पदग्रहणाची नियुक्तीपत्रे व संघटनेचे आयकार्ड देऊन कार्य तत्परतेची शपथ देण्यात आली तसेच पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

समाजामध्ये महिलांवरील अत्यांचार व इतर समस्या यावर शाळा कॉलेजमध्ये संघटनेच्या माध्यमातून प्रबोधन होणे आवश्यक आहे असे विचार सौ. सुनिता पाटील, यांनी मांडले. स्वानुभवाचे अनेक दाखले देऊन संघटना किती महत्वाची आहे हे सांगितले.

महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री. बाळकृष्ण वनकर यांनी संघटना पार्श्वभुमी, अधिकार, कर्तव्यनिष्ठा, समाजामध्ये बोकाळलेली सामाजिक व्यवस्था इत्यादी विषयांबाबत सखोल माहिती दिली. श्री. रफिक भाई रत्नागिरी, संजय सावंत लांजा, भाजपा संगमेश्वर महिला तालुका अध्यक्षा सौ. कोमल रहाटे, श्री. सुहास पाटील, श्री. विजय राऊत, श्री. शेखर जोगले, श्री. हिदायत शेख, श्री. सुशांत वेल्हाळ, श्री. जयकुमार जाधव, श्री. शेखर जाधव, श्री. अविनाश गुरव आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page