खासदार डाँ.श्रीकांत शिंदे यांचा दिवा शहराच्यावतीने होणार विशेष नागरी सत्कार

दिवा (प्रतिनिधी) ठाण्यातून राज्याचे पहिले मुख्यमंत्री झालेले मा.श्री एकनाथ शिंदे साहेब हे दिवा नगरीत येत असून या निमित्त त्यांच्या हस्ते येत्या बुधवारी 7 जून रोजी ,सायं.5.30 वाजता, धर्मवीर नगर,दिवा आगासन रोड पुर्व येथे विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भुमीपूजन करण्यात येणार आहे.तसेच दिवा शहराच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे खासदार डाँ.श्रीकांत शिंदे यांचा दिवा शहराच्यावतीने विशेष नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिव्यातील नवीन मुख्य जलवाहीनी लोकार्पण करणे,दिवा-आगासन मुख्य रस्ता,मातोश्री नगर येथील आरोग्य केंद्र,दातिवली गाव येथील व्यायाम शाळा,दातिवली गाव येथील खुला रंगमंच,पँकेज नंबर 214,साबेगाव येथील शाळा.क्रं.80 यांचे लोकार्पण होणार आहे.तर आगासन देसाई खाडीपुल,आगरी कोळी वारकरी भवन,धर्मवीर नगर येथे सामाजिक भवन,पँकेज नं.351,दातीवली येथील तलावाचे सुशोभिकरण,दिवा-शिळरोड बांधणी,पुरातत्व खिडकाळेश्वर शिवमंदिर परिसर सुशोभिकरण,देसाई गाव तलावाचे सुशोभिकरण आदी विविध विकास कामांचा भुमिपुजन सोहळा होणार आहे.
दरम्यान ना.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच दिवा शहरात येत आहेत.त्यामुळे येथील शिवसैनिकांत मोठा उत्साह दिसून येत आहे.याव्यतिरिक्त दिव्यात खा.डाँ.श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक कामे मार्गी लागत आहेत.खा.शिंदे यांनीही दिवा शहराला दिलेला वेळ लक्षात घेता त्यांचा दिवा शहराच्यावतीने विशेष नागरी सत्कार करण्यात येणार आहे.येत्या 7 जून रोजी लोकार्पण आणि भुमीपूजन सोहळा या कार्यक्रमाचे आजोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला दिव्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी उपमहापौर श्री रमाकांत मढवी,मा.नगरसेवक श्री शैलेश पाटील,उपशहरप्रमुख अँड.आदेश भगत,मा.नगरसेवक श्री अमर पाटील,मा.नगरसेविका सौ.दिपाली भगत,विभागप्रमुख श्री उमेश भगत,श्री निलेश पाटील,श्री गुरुनाथ पाटील,श्री भालचंद्र भगत, उपशहरप्रमुख श्री गणेश मुंडे,युवती प्रमुख कु.साक्षी मढवी,मा.नगरसेविका सौ.सुनिता मुढे,मा.नगरसेविका सौ.दर्शना म्हात्रे, मा.नगरसेवक श्री दिपक जाधव,विभागप्रमुख श्री चरणदास म्हात्रे, विभागप्रमुख श्री विनोद मढवी,श्री शशिकांत पाटील आदींनी केले आहे.