
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग ६ मध्ये शिवसेना-भाजपाचे अधिकृत उमेदवार राजीव यशवंत कीर, सौ. मेधा अविनाश कुळकर्णी यांच्या प्रचाराचा नारळ आज मोठ्या प्रमाणावर उपस्थित कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. नाचणे येथील ग्रामदैवत श्री नवलाई पावणाई मंदिरात आशीर्वाद घेऊन व श्रीफळ वाढवून याचा प्रारंभ करण्यात आला.
प्रभाग ६ अ मध्ये राजीव कीर व प्रभाग ६ ब मध्ये सौ. मेधाताई कुळकर्णी या निवडणूक लढवत आहेत. या प्रभागामध्ये मागील अनेक वर्षे शिवसेना व भारतीय जनता पक्षाचेच प्राबल्य आहे. तसेच याच प्रभागातील मागील नगरसेविका तथा माजी सभापती सौ. शिल्पाताई सुर्वे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे. या प्रभागात अनेक विकासकामे पालकमंत्री, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून झाली आहेत. त्यामुळे ही निवडणूक आम्ही नक्कीच मोठ्या फरकाने जिंकू असा दावा या वेळी दोन्ही उमेदवारांनी व्यक्त केला.
या वेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. शिल्पाताई सुर्वे, प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार राजीव कीर व सौ. मेधा कुळकर्णी, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, भाजपाचे जिल्हा निवडणूक प्रमुख अॅड. दीपक पटवर्धन, भाजपाचे निवडणूक प्रमुख सचिन वहाळकर, शिवसेनेचे विभागप्रमुख मनोज साळवी, उद्योजक अविनाश कुळकर्णी, भाजपा नेते राजेंद्र पटवर्धन,
कार्यक्रमाला शेखर लेले, प्रवीण देसाई, नरेश लिमये, माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी, सौ. ऋतुजा कुळकर्णी, सप्रणव पुराणिक, प्रवीण हर्डीकर, प्रशांत सुर्वे, नरेंद्र देसाई, रुचिता सुर्वे, सिद्धेश सुर्वे, रोहित शिवलकर, शैलेश बेर्डे, सुजाता बेर्डे, शोनाली आंबेरकर, अद्वैत कुलकर्णी, रूपेश बने, नंदकुमार बने, अतुल कर्लेकर, रोहित सावंतदेसाई, वैदेही भोवड आदी कार्यकर्ते व पदाधिकारी महायुतीचे आवर्जून उपस्थित होते व त्यांनी या तीनही उमेदवारांचा प्रचार करू, अशी ग्वाही दिली.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर