
वसई : वसई येथील समाजसेवक स्वप्नील डिकून्हा ह्यांनी आपल्या संघटनेकडे गेल्या दोन वर्षांपूर्वी वसई, भुईगाव इथल्या स्थानिक भूमीपूत्र यांच्या पडीक जमिनीवर एका परप्रांतीय पन्नालाल गुप्ता ह्या व्यक्तीने खोटा सात बारा बनवून त्याने ती जमीन बळकावली होती आणि त्यावर अनधिकृत बांधकाम देखील केल होत. त्याच संदर्भात स्वप्नील डिकन्हा ह्यांनी संघटनेकडे तक्रार केली होती.
त्याच अनुषंगाने संघटनेच्या माध्यमातून आपण सर्व पुराव्यानिशी संघटनेच्या मुख्य पत्राद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, मीरा- भाईंदर वसई -विरार आयुक्त, जिल्हाधिकारी, वसई पोलीस ठाणे वरिष्ठ अधिकारी आणि तलाठी कार्यालयात संघटनेच्या पत्राद्वारे तक्रार दाखल करण्यात आली होती.
संघटनेचे कार्याध्यक्ष धर्मेंद्र घाग, मीरा भाईंदर विधानसभा अध्यक्ष दिलीप घाग आणि स्वप्नील डिकून्हा आणि संघटनेचे पदाधिकारी ह्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वसई पोलीस ठाणे येथील वरीष्ठ पोलीस अधिकारी ह्यांची भेट घेतली. सदर ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ह्यांच्याकडून सांगण्यात आले.

काही महिन्यानंतर संघटनेचे पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख श्री. आशिष बोरघरे ह्यांनी ह्या संपूर्ण प्रकरण संदर्भात लोकायुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली. कोविड काळ असल्याकारणाने सदर ह्या चौकशीची सुनावणी ऑनलाइन होत होती.
कोविड नंतर पुन्हा लोकायुक्त मुंबई यांच्या कार्यालयात सुनावणी झाली, शेवटच्या सुनावणी दरम्यान संघटनेचे कार्याध्यक्ष धर्मेंद्र घाग हे स्वतः जातीने हजर राहिले. सुनावणी दरम्यान झालेल्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी पार पडली. सदर व्यक्तीची फसवणूक झाल्याचे माहिती द्वारे आढळून आले. फसवणुकीची शहानिशा झाल्यावर असे आढळून आले की, त्या परप्रांतीय पन्नालाल गुप्ता ह्या इसमाने ७/१२ मध्ये फेरफार केले होते आणि हे चौकशीनिशी पूर्ण सिद्ध झाले होते. खोटा सातबारा ची फेरफार लोकायुक्त यांच्याकडून रद्द करण्यात आली आणि सदर अनधिकृत बांधकाम काम तोडून सदर जागा मालकाला ताबा देण्याचे आदेश लोकायुक्त कार्यालय येथून वसई प्रांत कार्यालयाला पत्राद्वारे लेखी देण्यात आले. सदर फसवणूक केलेल्या पन्नालाल गुप्ता ह्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश लोकायुक्त यांनी दिले.
सदर दोन वर्षापासून च्या पाठपुराव्या नंतर ह्या प्रकरणी संदर्भात संघटनेला अभूतपूर्व यश लाभले आहे असा विश्वास महाराष्ट्र संरक्षण संघटना अध्यक्ष धर्मेंद्र घाग यांनी व्यक्त केला.

