संगमेश्वरदेवरुख- कर लो दुनिया मुठ्ठीमें…जग जवळ आले..भारत महासत्ता होणार असे असले तरी संगमेश्वर तालुक्यात काही गावात साधा फोन लागत नाही. टाॅवर आहेत ते शोभेचे बनले आहेत.
खाडीपट्टा परचुरी गावात संपर्काचे साधनच नाही.
टाॅवर उभे राहिले आहेत माञ ते कार्यान्वित कधी होणार ? असा नागरिकांचा सवाल आहे.घरातील एका कोपर्यात कधीतरी बीएसएनएलची रेंज येते. यासाठी फोन टांगून ठेवावा लागतो.तेव्हढाच संपर्काचा काय तो आधार ठरत आहे. गणेशोत्सव काळात गावी आलेल्या तरुणाईला यामुळे ञासाला सामोरे जावे लागले. गड्या आपला गाव बरा पण तीथे सुरु असलेला टाॅवर हवा…अशी नवी म्हण उदयास आली आहे.
खाडीपट्ट्या मध्ये बहुतेक्षकांमध्ये मोबाईल नेटवर्क प्रॉब्लेम आहे. रात्री अप रात्री रस्त्यामध्ये गाडी अडकल्यास कोणतीही व्यवस्था होणे कठीण आहे. इमर्जन्सी ला फोन लावणे लोकांना शक्यप्राय नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे. लवकरात लवकर टॉवर उभारून सर्वांना नेटवर्क मिळावे अशी मागणी नागरिकांची आहे.