महाराष्ट्र राज्यात परराज्यातून येणाऱ्या स्थलांतरितांवर निर्बंध आणणारा कायदा तात्काळ लागू करण्यात यावा, : महाराष्ट्र संरक्षण संघटना आक्रमक

Spread the love


दादर: प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यात परराज्यातून येणाऱ्या स्थलांतरितांवर निर्बंध आणणारा कायदा तात्काळ लागू करण्यात यावा,
✓ महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रकारच्या शिक्षणाचे माध्यम मराठी असणारे मराठी विद्यापीठ लवकरात लवकर सुरू करावे,
✓ महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रकारच्या नोकऱ्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी ९०% आरक्षित करणारा कायदा झालाच पाहिजे,
✓ १ मे १९६० अधिवास दाखला कायद्याने बंधनकारक करण्यात यावा,


✓ महाराष्ट्र राज्यात व्यवसाय उद्योग उभारयाचे असतील तर स्थानिकांची भागीदारी कायद्याने अनिवार्य करण्यात यावी,
✓ महाराष्ट्र राज्यातील प्रशासकीय अधिकारी, पोलिस व केंद्र सरकारचे अधिकारी हे ९०% स्थानिक असतील असा कायदा करण्यात यावा.

या आणि अशा आपल्या मराठी माणसांच्या मागण्यांसाठी, न्याय हक्कांसाठी अनेक वर्षांपासून बिगर राजकीय चळवळ असणारी, रजिस्टर असलेली ||महाराष्ट्र संरक्षण संघटना|| संलग्न {मी मराठी एकीकरण समिती} या मराठी भाषा जतन व संवर्धन, मराठी संस्कृती संरक्षण तसेच मराठी माणसांच्या महाराष्ट्र राज्यातील अस्तित्वासाठी लढणाऱ्या संघटनेचा,

ह्या आपल्या ||महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या|| मेळाव्याचे औचित्य साधून संघटनेचे कार्याध्यक्ष असलेले श्री. धर्मेंद्र चंद्रकांत घाग साहेबांच्या शुभ हस्ते आज मला ||महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या|| उपाध्यक्ष- मुख्य पदाधिकारी कार्यकारिणी पदी नियुक्ती देण्यात आलेली असून तशी आजच्या ह्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात जाहीर घोषणा करून तसे सर्वानुसंमती नियुक्तपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र संरक्षण संघटनेनी आखून दिलेल्या घटनेच्या अधिन राहून यापुढे मी ||महाराष्ट्र संरक्षण संघटनेत|| कार्यरत राहून महाराष्ट्र राज्य तसेच मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी सर्वस्व पणाला लावून या पूढे लढेन असे मी ||महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या|| आजच्या मेळाव्याचे औचित्य साधून आज सर्वसाक्षी गाव्ही देतो धन्यवाद!
जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठी!
_@ श्री. रविंद्र शांताराम शिंदे,
(उपाध्यक्ष- मुख्य पदाधिकारी कार्यकारिणी)

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page