मुंबई- 2023-24 पावसाळी अधिवेशनामध्ये धरणासंबंधी प्रश्न मांडताना पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मोठ मोठ्या धरणाची आवश्यकता नसून पाझर तलावाची आवश्यकता आहे असा महत्त्वाचा मुद्दा आमदार शेखर निकम यांनी उपस्थित केला.
यामध्ये साडेचर वर्षापुर्वी फुटलेला तिवरे धरण बांधण्यास अंतिम मंजूरी मिळावी. तसेच राजेवाडी डेरवण पाझर तलाव दुरुस्ती उमरे धरण दुरुस्ती व्हावी व त्यामध्ये पाणी साठवण करावे यासाठी मंत्री महोदयास विनंती केली जेणेकरुन या धरणांवर व पाझर तलाव यावर अलंबुन असलेली गावे यांचा पाणी प्रश्न सुटेल. तसेच तिवरे धरणग्रस्त उर्वरीत लोकांचे तातडीने पुर्नवसन व्हावे यासाठी भूमिका मांडली.
याबाबत मा. उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर दिले.