पाचल | ऑगस्ट ०७, २०२३
देशगौरव पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या सुशासन काळाला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने राजापूर विधानसभेमध्ये भाजपा नेत्या सौ. उल्का विश्वासराव यांच्या नेतृत्त्वाखाली ‘संपर्क से समर्थन अभियान’ विविध उपक्रमांच्या माध्यमातून संपन्न होत आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक वाडी-वस्तीमध्ये अगदी अंतिम घरापर्यंत पोचण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेऊन भाजपा कार्यकर्ते सौ. विश्वासराव यांच्या मार्गदर्शनात कार्यरत आहेत.
काल पाचल येथील धनगरवाडीला भेट देत तेथील नागरिकांना मोदीजींना केलेल्या कार्याची माहिती दिली. रोजगार, शेती, संरक्षण, महिलाविषयक धोरण, तसेच तांडा वस्त्यांविषयक विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत या योजनांचा लाभ मिळत असल्याची खात्री करून घेतली. स्थानिकांच्या गरजा आणि समस्या समजून घेतल्या. गरजांच्या पूर्ततेसाठी आणि समस्या दूर करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे सांगून त्यांना आश्वस्त केले. तसेच मोदीजींच्या कार्याला समर्थन देण्यासाठी ९०९०९०२०२४ या क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याचे आवाहन यावेळी सौ. उल्का विश्वासराव यांनी केले. उपस्थित सर्वांनी याला योग्य प्रतिसाद दिला शिवाय उर्वरित लोकांनाही मिस्ड कॉल देण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आश्वासन लोकांनी दिले.
यावेळी या वस्तीमध्ये अपेक्षित असणाऱ्या विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. सौ. विश्वासराव म्हणाल्या, “विकास हा मा. मोदीजींच्या सरकारचा मुख्य उद्देश आहे. तुमचे जीवनमान उंचावण्यासाठी मोदीजींचे दूत म्हणून आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू. लवकरात लवकर तुम्ही विकासकामांची यादी तयार करा. ग्रामपंचायतीत आवश्यक ठराव करून आमच्याकडे सुपूर्द करा. आम्ही योग्य ठिकाणी पाठपुरावा करून आपल्या भागाचा विकास नक्कीच करून दाखवू.” यावेळी श्री. चंद्रकांत लिंगायत, श्री. सुनील पवार, श्री. सुभाष काळे, श्री. शांताराम कोकटे, श्रीम. सुनंदा चौघुले, श्रीम. झीमाबाई झोरे, श्री. कोंडीराम बोडके, श्री. धोंडू बावधने, श्री. विक्रांत चव्हाण, श्री. धनेश कोकटे, श्री. विठ्ठल शेळके तसेच वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
हे वाचा –
▶️https://janshaktichadabav.com/it-is-the-responsibility-of-all-of-us-to-cooperate-with-the-authorities-from-house-to-house/
▶️
https://janshaktichadabav.com/bhoomipujan-for-concreting-and-beautification-of-roads-connecting-major-twelve-stations-of-konkan-railway-will-be-held-on-tuesday-8/